नवी दिल्ली: कोरोनाची दुसरी लाट अद्याप पूर्णपणे ओसरलेली नसताना तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे मुंबईच्या लोकल रेल्वेमध्ये सर्वसामान्यांना प्रवेशबंदी करण्यात आली होती. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला दिलासा देत १५ ऑगस्टपासून कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी देण्याचा निर्णय रविवारी जाहीर केला. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरेंच्या निर्णयाचे स्वागत केले असून यावेळी त्यांनी निर्णय जाहीर करण्याआधी रेल्वेसोबत चर्चा करायला हवी होती असे म्हटले आहे. त्यावरून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. (shiv sena sanjay raut replied raosaheb danve over thackeray govt decision about mumbai local train)
संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना रावसाहेब दानवे यांच्या विधानाचा समाचार घेतला. राज्य सरकारने लोकलबाबत कॅबिनेट मंत्र्यांशी चर्चा केली असेल. रावसाहेब दानवेंशी चर्चा करण्याची गरज नाही, असा टोला संजय राऊत यांनी यावेळी लगावला.
“सगळं केंद्रानं करावं, द्यावं; मी फक्त घरात बसणार आणि ठेकेदारांची बिलं काढणार”
कोरोना संक्रमण वाढू नये म्हणून लोकल बंद होती
रेल्वे ही देशाची संपत्ती आहे. ती कुठल्या राजकीय पक्षाची नसते. पण काही लोकांना वाटते की रेल्वे आमची खाजगी संपत्ती आहे किंवा राष्ट्रीय स्तरावरील काही गोष्टी ज्याच्यावर राष्ट्रीय स्तरावर निर्णय घ्यायला पाहिजे त्या आमच्या व्यक्तीगत आहेत. आमच्या पक्षाच्या आहेत असे वाटते. मुंबईमध्ये लोकल सुरु करावी यासाठी सर्वात मोठे आंदोलन भाजपाने केले. मुंबईमध्ये करोना संक्रमण वाढू नये म्हणून लोकल बंद होती. आता ही संख्या घटतेय तेव्हा मुख्यमंत्री निर्णय घेणार होते. पण भाजपा अगदी रस्त्यांवर, रुळांवर आडवे पडले. असे आडवे पडले की इथून आम्ही उठणारच नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
“सचिन पायलट लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील”; राष्ट्रीय उपाध्यक्षांचा दावा
रेल्वे भाजपाची नोकर आहे काय?
केव्हाही रेल्वे सुरु करा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असे रावसाहेब दानवे यांनी सांगितले होते. आता शिर्षासन कशाला करताय. हा सर्व जो काही प्रकार चाललेला आहे, याला उलट्या खोपडीचं राजकारण म्हणतात. काल म्हणाले सुरु करा आणि आज इथे त्यांचे लोक आले आणि रावसाहेबांची भाषा बदलली. रेल्वे काय भाजपाची नोकर आहे का?, अशी विचारणा करत आपण महाराष्ट्र सरकारला सहकार्य केले पाहिजे. तुमचे तुम्ही बघा आमचे आम्ही बघु हा काय प्रकार आहे, या शब्दांत संजय राऊत यांनी रावसाहेब दानवे यांना प्रत्युत्तर दिले आहे.