शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

भाजपला शिवसेनेचा १०० टक्के पाठिंबा; काँग्रेसची मदार मनसेवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 01:37 IST

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांना शिवसेनेने १०० टक्के पाठिंबा दिला आहे.

मुंबई : उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांना शिवसेनेने १०० टक्के पाठिंबा दिला आहे. शिवाय आरपीआय आणि रासपाचाही पाठिंबा मजबूत आहे. तर दुसरीकडे काँग्रेसच्या उमेदवार ऊर्मिला मातोंडकर यांना राष्ट्रवादीचा भरघोस पाठिंबा असून, मनसेने अप्रत्यक्ष पाठिंबा दिला आहे. परिणामी, मनसेच्या पाठिंब्यावर काँग्रेसची खरी मदार असून, दिवसागणिक रंगत असलेल्या या मतदारसंघातील प्रचार आणि प्रसाराकडे अवघ्या देशासह मुंबईचेही लक्ष लागून राहिले आहे; कारण येथून बॉलीवूडचा चेहरा असलेल्या ऊर्मिला मातोंडकर लोकसभेच्या रिंगणात उतरल्या आहेत.गोपाळ शेट्टी यांचा प्रचार आणि प्रसार दिवसागणिक जोर धरत आहे. उत्तर मुंबई जिल्हा, मंडळ, वॉर्डतील महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जोमाने शेट्टी यांच्या प्रचार आणि प्रसारात सहभागी होत आहेत. दहिसर पूर्वेकडील हनुमान मंदिर जंक्शन येथे आयोजित निवडणुकीच्या मोहिमेत महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. दहिसर टेलिफोन एक्सचेंज येथेही हेच चित्र होते. बोरीवली पश्चिमेकडील चंदावरकर रोड, मालाड येथील कच्चा रोड येथे महायुतीच्या पदाधिकारी वर्गासह कार्यकर्ते जोमाने सहभागी होत आहेत. महत्त्वाचे म्हणजे केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी हेदेखील शेट्टी यांच्या प्रचारार्थ येथे दाखल झाले होते. याव्यतिरिक्त अन्य समाजाचे लोकही शेट्टी यांच्या प्रचारात सहभागी होत आहेत. मालाड, कांदिवली, चारकोप येथील प्रचारावर शेट्टी यांचा सर्वाधिक भर असून, मित्रपक्षाचे पदाधिकारी सोशल मीडियावरही अधिक भर देत आहेत.काँग्रेसच्या उमेदवार ऊर्मिला मातोंडकर यांच्या प्रचारातही महाआघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जोमाने सहभागी होत आहेत. ‘आपलीमुंबईचीमुलगी’ अशा हॅशटॅगने सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असलेल्या ऊर्मिला यांना राष्ट्रवादीचा भरघोस पाठिंबा मिळत असला तरी त्यांची खरी मदार ही मनसेवर अवलंबून आहे. राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांची ऊर्मिला यांनी घेतलेली भेट आणि त्यानंतर मनसेच्या पदाधिकारी वर्गाची घेतली भेट; याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे. सभा आणि प्रचारांना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित असले तरीदेखील मनसेचा पाठिंबा कितपत मिळतो; यावर काँग्रेसचा जोर दिसून येईल. ऊर्मिला यांचा प्रचार लक्षवेधी ठरत असून, पुढील काळात मनसेचा पाठिंबा ऊर्मिला यांनी कितपत मिळतो यावर राजकीय गणिते अवलंबून असणार आहेत.>बाळासाहेबांचा आशीर्वाद आहे...महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याकडून प्रचार, प्रसारास पाठिंबा मिळत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद पाठीशी आहेत. पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या जोरावर प्रचाराला आणखी बळ मिळते आहे.- गोपाळ शेट्टी>राष्ट्रवादी आणि मनसेचे साहाय्यमित्रपक्षांबद्दल आदर आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे आशीर्वाद, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे साहाय्य अपेक्षित आहे. पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा पाठिंबा जोरदार असून, महाआघाडीच्या जोरावर प्रचार आणि प्रसार व्यवस्थित सुरू आहे.- ऊर्मिला मातोंडकर>मित्रपक्ष म्हणतो तरी काय..?>भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांना शिवसेनेचा १०० टक्के पाठिंबा आहे. झोपड्या असो, चाळी असो; त्यांच्या प्रत्येक प्रचारात शिवसेनेचे पदाधिकारी सहभागी होत असून, प्रचार याच वेगाने पुढे सुरू राहील.- विनोद घोसाळकर, शिवसेना उपनेतेऊर्मिला जेथे जेथे प्रचारासाठी जात आहेत; तेथे तेथे आमचे पदाधिकारी, कार्यकर्ते त्यांच्या प्रचारात सहभागी होत आहेत. आमच्या प्रचार आणि प्रसाराला आणखी वेग येईल.- इंद्रपाल सिंग, अध्यक्ष, उत्तर मुंबई, राष्ट्रवादी काँग्रेस

टॅग्स :MNSमनसेMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019mumbai-north-pcमुंबई उत्तर