शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची युद्धात उडी, शेकडो क्षेपणास्त्रांद्वारे इस्राइलवर मोठा हल्ला, तेल अवीवमध्ये खळबळ
2
इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यादरम्यानच भीषण दहशतवादी हल्ल्याने इस्राइल हादरले, ४ जणांचा मृत्यू, दोन दहशतवाद्यांचा खात्मा   
3
"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!
4
सनातन धर्माची रक्षा करणे ही आमची जबाबदारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान  
5
'पृथ्वीवरील सर्व खोटारडे मेले, तेव्हा राहुल गांधींचा जन्म झाला', शिवराज सिंह यांची बोचरी टीका
6
हॉटेलमध्ये प्रियकरासोबत शरीरसंबंध ठेवत असताना तरुणीचा मृत्यू, समोर आलं धक्कादायक कारण  
7
...म्हणून माजी सैनिकाने १४ दिवसांपासून डीप फ्रिजरमध्ये ठेवलाय मुलाचा मृतदेह, समोर आलं धक्कादायक कारण
8
IPL संघाच्या मालकाने खरेदी केला इंग्लडचा क्रिकेट क्लब; कोट्यवधींचा झाला व्यवहार
9
चमचम करता है नशीला बदन.... युजवेंद्र चहलची पत्नी धनश्रीचा 'स्पेशल' लूक, पाहा Photos
10
कोल्हापूरमधील मुरगूड येथे शिक्षकाने प्राध्यापिका पत्नीचा केला खून, समोर आलं धक्कादायक कारण
11
राहुल गांधींनी गोहाना जिलेबीची चव चाखली; काय आहे तिची खासियत?
12
GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली
13
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
14
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
15
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
16
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
17
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
18
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
19
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव
20
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ

“रावसाहेब दानवेंची हकालपट्टी करा”; ‘त्या’ विधानावरुन शिवसेनेची PM मोदींकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2021 10:59 PM

भाजप नेते आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब यांनी केलेल्या एका विधानावरून काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आता शिवसेनेने रावसाहेब दानवे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.

रत्नागिरी: भाजपच्या वतीने काढण्यात आलेल्या जनआशीर्वाद यात्रेवरून महाविकास आघाडीतील नेते आणि भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत. विशेष करून नारायण राणे शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नसून, शिवसेनेकडूनही नारायण राणे आणि भाजपला प्रत्युत्तर देण्यात येत आहे. यातच भाजप नेते आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब यांनी केलेल्या एका विधानावरून काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आता शिवसेनेने रावसाहेब दानवे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. (shiv sena vinayak raut comment on raosaheb danve statement over rahul gandhi)

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राहुल गांधी हे काही कामाचे नाहीत, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काम करणारे, बैलांसारखे राबत असल्याचे विधान केले होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना उदाहरण देत असल्याचे सांगितले होते. दानवेंच्या या विधानानंतर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतल्याचे पहायला मिळाले असून, शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी रावसाहेब दानवे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी केली आहे. ते रत्नागिरीत बोलत होते. 

“महाराष्ट्रात कोणताही पक्ष स्वबळावर सत्ता स्थापन करू शकत नाही”; केंद्रीय मंत्र्यांचा दावा

भाजपच्या नेत्यांना सत्तेची मस्ती आलीय

भाजपच्या नेत्यांना सत्तेची मस्ती आली आहे. त्यातून त्यांची विकृती दिसून येते. दानवेंची बुद्धी भ्रष्ट झाली असून, त्यांच्या विधानाची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घ्यावी, या शब्दांत विनायक राऊत यांनी टीका केली आहे. नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा रत्नागिरी, सिंधुदुर्गात जाणार असल्याबाबत विनायक राऊत यांना विचारले असता, त्याचा कोणताही परिणाम शिवसेनेवर होणार नाही. नारायण राणे यांच्या शक्ती प्रदर्शनाला काहीही अर्थ नाही. उलट राणे कोकणात तिसऱ्या लाटेला आमंत्रण देत आहेत. अशा रितीने आशीर्वाद यात्रा काढून कोकणात शिवसेनेला कोणताही फटका बसणार नाही. कोकणात कालदेखील शिवसेना होती. आजही आहे. तसेच ती उद्या देखील राहणार असून, नारायण राणेंच्या यात्रेला गंभीरपणे घेण्याचे कारण नाही, असा टोला लगावण्यात आला आहे. 

“आता सामनाचे नाव बदलावे आणि पाकिस्ताननामा किंवा बाबरनामा करावे”; भाजपची टीका

दरम्यान, बाडगा हा नेहमी कोडगा असतो. राणेंकडून मंत्री एकनाथ शिंदे यांची बदनामी केली जात आहे. सत्तेसाठी द्रोह करणे हा नारायण राणेंचा स्थायीभाव आहे. राणेंनी सत्तेसाठी लाचार होत द्रोह केला असे म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे खंबीर खांब असल्याचे विनायक राऊत यांनी म्हटले आहे. एकनाथ शिंदे नाराज असून, त्यांना प्रत्येक फाईलवर सही करण्यासाठी 'मातोश्री'ची परवानही घ्यावी लागते. भाजपमध्ये आल्यास त्याचे स्वागत असल्याचे नारायण राणे यांनी वसई-विरार येथील जनआशीर्वाद यात्रेवेळी म्हटले होते.  

टॅग्स :PoliticsराजकारणRatnagiriरत्नागिरीraosaheb danveरावसाहेब दानवेBJPभाजपाShiv SenaशिवसेनाVinayak Rautविनायक राऊत congressकाँग्रेस