शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलसोबत युद्ध सुरू असतानाच इराणचं मोठं विधान; म्हणाला- नेतन्याहू या शतकातील 'नवा हिटलर, तर भारत..."
2
“भाजपाने आधीच हार मानली, २०२४ च्या विधानसभेला मविआचेच सरकार येणार”; नाना पटोलेंचा दावा
3
शरद पवार शिंदे गटाला धक्का देणार! तानाजी सावंतांचे पुतणे अनिल सावंत राष्ट्रवादीत प्रवेश करणार
4
विरुष्काचे अनोखे 'क्रिकेट'! अनुष्काने वाचला नियमांचा पाढा; विराटने डोक्यालाच हात लावला
5
इस्त्रायलचे 'ते' ३ मित्र जे संकटात बनतात सुरक्षा कवच; ज्यांनी इराण हल्ल्यातून वाचवले
6
IPO News : आयपीओंचा महापूर येणार, एकाच दिवसात १३ कंपन्यांनी सेबीकडे केले अर्ज
7
बिहार : हवाई दलाचे हेलिकॉप्टर पुराच्या पाण्यात पडले; अंगावर काटा आणणारे दृश्य, पूरस्थिती कायम
8
Mohammad Shami, Team India, IND vs AUS: टीम इंडियाला मोठा धक्का! मोहम्मद शमी रूग्णालयात, ६ ते ८ आठवड्यांसाठी सक्तीची विश्रांती
9
काही लोक गांधीजींचा विचार विसरले, फक्त त्यांच्या नावाने मते घेतली; मोदींचा टोला
10
खळबळजनक! नागपूर जिल्ह्यात कुटुंबाची सामूहिक आत्महत्या; पती-पत्नीसह दोन मुलांनी घेतला गळफास
11
अरे बापरे! 2000 कोटींचे ड्रग्ज जप्त, दिल्लीत चार जणांना अटक
12
५० वर्षानंतर अमेरिकेत पहिल्यांदाच 'असं' काय घडलं?; चीन-पाकिस्तानही चिंताग्रस्त
13
अरे बापरे! लोकांच्या डोळ्यातून येतंय रक्त; खतरनाक इबोलासारखा जीवघेणा आहे 'हा' व्हायरस
14
लाडक्या बहि‍णींची दिवाळी; भाऊबीजेची ओवाळणी ऑक्टोबरलाच, सरकार नोव्हेंबरचे पैसे आधीच देणार
15
प्रशांत किशोर : UN मध्ये ८ वर्षे नोकरी, निवडणूक रणनीतीकार ते राजकीय पक्ष... आठ पक्षांसोबत केलंय काम!
16
56 वर्षांनंतर सापडला हवाई दलातील शहीद जवानाचा मृतदेह; 23व्या वर्षी आलेले हौतात्म्य
17
"हानिया अन् हसन नसरल्लाह...", इस्रायलवरील मिसाइल हल्ल्यानंतर काय म्हणाला इराण?
18
Numerology: ‘या’ ७ मूलांकांवर देवीची कृपा, सुख-समृद्धीचा लाभ; कामात यश, अचानक धनलाभ!
19
भयानक! रोलर कोस्टरवरची मजा बेतली जीवावर; ५ वर्षांच्या मुलाला आला कार्डिएक अरेस्ट
20
सणासुदीत विना टेन्शन खरेदी करू शकाल इलेक्ट्रिक गाड्या, सरकारनं सुरू केली नवी सब्सिडी स्कीम

Vinayak Raut : राणेंसारख्या विश्वासघातकी माणसाला बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर जाण्याचा नैतिक अधिकार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 3:39 PM

Shiv Sena Vinayak Raut Criticised BJP Narayan Rane over jan ashirwad yatra in mumbai : स्मृती स्थळाला भेट देण्याचा नारायण राणेंना नैतिक अधिकार नाही. शिवसैनिक त्यांना स्मृती स्थळावर येऊ देणार नाही, असा इशारा राऊत यांनी दिला आहे. 

सिंधुदुर्ग: गेल्या काही दिवसांपासून मुंबई महापालिकांच्या आगामी निवडणुकांविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. यातच केंद्रात नव्याने मंत्री झालेल्या महाराष्ट्रातील चार नेत्यांनी राज्याच्या विविध भागात जनआशीर्वाद यात्रा सुरू केली आहे. नव्या मंत्र्यांनी जनतेशी संवाद साधावा, यासाठी ही यात्रा काढल्याचे सांगितले जात असले, तरी या माध्यमातून भाजपने महापालिका निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू केल्याची चर्चा असल्याचे सांगितले जात आहे. केंद्रीयमंत्री नारायण राणे आपल्या जनआशीर्वाद यात्रेची सुरुवात १९ ऑगस्ट रोजी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाला भेट देऊन करणार असल्याचे समजते. यावरून आता शिवसेना आक्रमक झाली असून, नारायण राणेंसारख्या विश्वासघातकी माणसाला बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर जाण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी टीका राऊतांनी केली आहे. (Shiv Sena Vinayak Raut Criticised BJP Narayan Rane over jan ashirwad yatra in mumbai)

सेनेला शह देणार! नारायण राणेंवर ‘मिशन ११४’ ची जबाबदारी? BMC निवडणुकीसाठी BJP ची तयारी

दादरमधील शिवाजी पार्कवरील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाला भेट देऊन अभिवादन करून जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात करणार आहेत. यावरून शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना नारायण राणेंवर टीका केली आहे. स्मृती स्थळाला भेट देण्याचा नारायण राणेंना नैतिक अधिकार नाही. शिवसैनिक त्यांना स्मृती स्थळावर येऊ देणार नाही, असा इशारा राऊत यांनी दिला आहे. 

“राष्ट्रवादीचे संकुचित राजकारण महाराष्ट्र गेले २० वर्षे बघतोय”; मनसेचा पलटवार

बाळासाहेबांशी बेईमानी करणारा दुसरा नेता महाराष्ट्रात नाही

नारायण राणेंसारखा बाडगा आणि बाळासाहेबांशी बेईमानी करणारा दुसरा नेता महाराष्ट्रात नाही. त्यामुळे अशा या घरफोड्याला शिवसैनिक बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाला भेट देऊ देणार नाहीत, असा इशारा विनायक राऊत यांनी दिला आहे. नारायण राणे ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेविरोधात उभे राहतात, तिथे शिवसेनेचाच विजय होतो हा इतिहास आहे. राणेंचे पानिपत करण्याची ताकद शिवसैनिकांमध्ये आहे. राणे समोर असल्यावर ही ताकद आणखीनच वाढते. त्यामुळे भाजपने राणेंवर मुंबईच काय ठाणे महापालिका आणि इतर महापालिकेची जबाबदारी दिली तरी सर्वत्र शिवसेनेचा आणि महाविकास आघाडीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही, असा दावा राऊतांनी व्यक्त केला आहे. 

“RSS चे मोहन भागवत खरंच देशभक्त असतील, तर त्यांनी...”; ओवेसींचे खुले आव्हान!

दरम्यान, दिल्लीतील भाजप नेतृत्वाने नारायण राणेंकडे कोकण आणि मुंबईची जबाबदारी दिली असून, मुंबई महापालिकेची निवडणूक पुढच्या वर्षी होत असल्याने मिशन ११४ ची जबाबदारी दिली आहे. मुंबई महापालिकेत ११४ जागा किंवा त्याहून अधिक जागा निवडून आणण्याची जबाबदारी देण्यात आली असून, कोणत्याही परिस्थितीत हे मिशन यशस्वी करा, असे पक्षश्रेष्ठींकडून सांगण्यात आले आहे. शिवसेनेला शह देण्यासाठी नारायण राणेंकडे मिशन देण्यात आले असून, महापालिका निवडणुकीत शिवसेनेविरोधात राणेंच्या ताकदीचा पुरेपूर वापर करून घेण्याचे भाजपने ठरवल्याचे सांगितले जात आहे. महापालिका निवडणुकीत नारायण राणेंच्या एन्ट्रीने ही निवडणूक शिवसेनेसाठी अत्यंत संघर्षाची ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

टॅग्स :PoliticsराजकारणNarayan Raneनारायण राणेBJPभाजपाShiv SenaशिवसेनाVinayak Rautविनायक राऊत Balasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेMumbaiमुंबई