शहरं
Join us  
Trending Stories
1
CM म्हणून शिंदेंना मोठी पसंती, उद्धव ठाकरेंना किती मते; फडणवीस-राज ठाकरेंना किती टक्के कौल?
2
“नाना पटोलेंनी मुख्यमंत्री होणार असे कुठेही म्हटले नाही”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
3
Exit Poll: दोन्ही NCP तुल्यबल; एकनाथ शिंदेच ठरणार वरचढ, उद्धव ठाकरेंना किती जागा मिळणार?
4
१०७ जागांसह भाजपा सर्वांत मोठा पक्ष, महाविकास आघाडीला १०२ जागा; नवीन Exit Pollचा अंदाज
5
अदानी समूहाला आणखी एक झटका; अडचणीत असताना मोठा आंतरराष्ट्रीय करार रद्द
6
महायुती की मविआ, कुणाला मिळणार 'सिंहासन'? विभागनिहाय कुणाचं पारडं ठरणार जड? असा आहे लेटेस्ट 'Exit Poll'!
7
"दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या व्यवस्था अन् संस्था कोलमडत आहेत"; गयानाच्या संसदेत काय बोलले PM मोदी?
8
मनोज जरांगेंची ऐनवेळी निवडणुकीतून माघार; ४८ टक्के मराठा समाजाने महायुतीला दिली पसंती
9
Exit Poll: २०१९ मध्ये एकमेव खरा ठरलेला एक्झिट पोल आला; महायुती-मविआच्या मतांत १० टक्क्यांचे अंतर...
10
“गुलाल आम्ही उधळणार, महायुतीची सत्ता ५ वर्ष टिकणार, एकनाथ शिंदेच CM होणार”: संतोष बांगर
11
मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण; हायकोर्टाकडून आरोपीला जामीन
12
“अमित शाह यांनी CM भाजपाचा असेल असे कधी म्हटले नाही”; महायुतीतील नेत्याचे सूचक विधान
13
‘लाडकी बहीण’ योजनेचा फायदा महायुतीला मिळेल का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महिलांनी मतदान...”
14
“अदानींविरोधात अमेरिकेत काढलेले अटक वॉरंट म्हणजे देशासाठी शरमेची गोष्ट”: संजय राऊत
15
“लाच देऊन कंत्राटे मिळवल्याचे स्पष्ट, भ्रष्ट गौतम अदानींना अटक का करत नाही?”: नाना पटोले
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना अटक होणार? इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टानं जारी केलं 'अरेस्ट वॉरंट'
17
"सरकार तर स्थापन होऊ द्या"; मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवरुन काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने नाना पटोलेंना झापलं
18
IND vs AUS: ना विराट, ना रोहित, ना बुमराह; ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर 'हा' खेळाडू ठरेल 'हिरो'- पुजारा
19
गुगलला क्रोम ब्राऊझर विकावा लागण्याची शक्यता; अमेरिकन सरकार दबाव टाकणार
20
IND vs AUS: "विराट म्हणजे क्रिकेटचा सुपरस्टार"; ऑस्ट्रेलियन खेळाडूची पत्नी 'किंग कोहली'वर फिदा

कोपरी पाचपाखाडीमध्ये शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंनी साधला विजयाचा चौकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 10:08 PM

मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री तथा शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी निर्णायक आघाडी घेतली. ही आघाडी अखेरपर्यंत ठेवत ८९ हजार ३०० मताधिक्याने आपला गड कायम ठेवला.

ठळक मुद्दे८९ हजार ३०० चे मताधिक्यपहिल्या फेरीपासूनच आघाडीमतदारांचे मानले आभार

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी ८९ हजार ३०० मताधिक्याने आपला गड कायम ठेवला. त्यांनी काँग्रेसचे संजय घाडीगावकर यांचा पराभव करून विजयाचा चौकार साधला. महायुतीच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत, मतदारांनी दाखविलेले प्रेम आणि आशीर्वाद यामुळे हा विजय मिळवू शकल्याची प्रतिक्रिया विजयानंतर त्यांनी व्यक्त केली.मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच त्यांनी निर्णायक आघाडी घेतली. पहिल्या फेरीत त्यांना चार हजार २३० मते मिळाली. त्यावेळी काँग्रेसच्या घाडीगावकर यांना ८९८, तर मनसेच्या महेश यांना ५५५ मते मिळाली. वंचित आघाडीचे उन्मेष बागवे हे चौथ्या क्रमांकावर होते. त्यांना अवघी २३१ मते मिळाली. पुढे २७ व्या फेरीपर्यंत शिंदे यांनी आघाडी कायम राखली. एक लाख १३ हजार ४९७ अर्थात एकूण मतदानाच्या ६५.३६ टक्के मते मिळवून ते विजयी झाले. पराभूत घाडीगावकर यांना २४ हजार १९७ मते मिळाली. तर, मनसेच्या कदम यांना २१ हजार ५१३ मते मिळाली. २०१४ मध्ये शिवसेना व भाजप युती नसतानाही शिंदे यांना एक लाख १४८ मते मिळाली होती. त्यावेळी भाजपच्या संदीप लेले यांचा त्यांनी पराभव केला होता. गेल्या विधानसभेच्या शिवसेना, भाजपच्या एक लाख ४८ हजार ५९५ मतांसह एक लाखाहून अधिक मताधिक्य मिळेल, असा विश्वास शिंदे यांना होता. अपेक्षित मताधिक्य साधता न आल्याने अनेक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. दरम्यान, २००९ मध्येही ३२ हजार ७७६ चे मताधिक्य शिंदे यांना होते. २०१४ च्या तुलनेत यावेळी १३ हजार ३४९ चे मताधिक्य त्यांना मिळाले आहे. यावेळी ८९ हजार ३०० चे मताधिक्य साधून चौथ्यांदा यशस्वी ठरल्याने चौदाव्या फेरीलाच कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांचा सत्कार करून जल्लोष केला.‘‘महायुतीच्या कार्यकर्त्यांची मेहनत, मतदारसंघात केलेली विकासकामे, मतदारांचे प्रेम, विश्वास आणि आशीर्वादाच्या जोरावर ही निवडणूक जिंकलो. सर्व मतदार, कार्यकर्ते तसेच आपल्यावर विश्वास दाखवून उमेदवारी देणाऱ्या शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आभारी आहे.’’एकनाथ शिंदे, नवनिर्वाचित आमदार, कोपरी-पाचपाखाडी..................‘‘जनतेने दिलेला कौल मला मान्य आहे. तसेच काँग्रेसच्या माध्यमातून ठाणे शहराला व ठाणेकरांना ज्या गोष्टी आवश्यक आहेत, त्या करण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहील. ’’संजय घाडीगावकर, पराभूत उमेदवार, काँग्रेस.........................नोटाचे प्रमाण २.९६ टक्केया मतदारसंघात ४४३ पैकी ३४४ मतदारांनी शिंदे यांना टपाली मतदानातून कौल दिला. काँग्रेसच्या घाडीगावकर यांना २२ मते मिळाली. तब्बल पाच हजार १४७ मतदारांनी ‘नोटा’चा वापर करून सर्वच उमेदवारांना नाकारले. हे प्रमाण एकूण मतदानाच्या २.९६ इतके टक्के आहे.

टॅग्स :thaneठाणेElectionनिवडणूकkopri-pachpakhadi-acकोपरी-पाचपाखाडी