मुंबई - केंद्र सरकारने आदर्श भाडेकरू कायद्याला मंजुरी दिल्यामुळे अल्पदरात राहणाऱ्या भाडेकरूंवर अन्याय होणार आहे. नवीन कायद्यानुसार पागडी पद्धतीने रहाणार्या भाडेकरूंचे भाडे बाजारभावानुसार आकारण्याचे अधिकार मालकाला मिळणार आहेत. तसेच भाडे थकविल्यास घर रिक्त करण्याची मोकळीक मालकांना मिळणार आहे.
भाडेकरूंवर अन्याय करणाऱ्या केंद्र सरकारच्या कायद्या विरोधात शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना विभाग क्र १ च्या वतीने आज बोरीवली ( पू ) येथे नॅशनल पार्क गेट समोर उग्र आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात शिवसेना विभागप्रमुख,आमदार विलास पोतनीस,आमदार, प्रकाश सुर्वे, महिला विभागसंघटक सुजाता शिंगाडे, शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी, विधी समिती अध्यक्ष हर्षद कारकर, प्रभाग समिती अध्यक्षा सुजाता पाटेकर, नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद,नगरसेवक संजय घाडी, नगरसेविका शितल म्हात्रे,नगरसेविका रिद्धी खुरसंगे,नगरसेविका गीता सिंघण, नगरसेविका माधुरी भोईर तसेच सर्व पुरुष व महिला उपविभागप्रमुख,विधानसभा संघटक, विधानसभा समन्वयक, शाखाप्रमुख, शाखासंघटक उपस्थित होते.