शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
3
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
4
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
5
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
6
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
7
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
8
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
9
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
10
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
11
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
12
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
13
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
14
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
15
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
16
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
17
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
18
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
19
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
20
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

"शिवसेनेची स्वबळावर लढण्याची तयारी", खासदार संजय राऊत यांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2021 2:51 PM

sanjay Raut News: स्थानिक स्वराज्य संस्थेसह लोकसभेची जागा आम्ही लढविण्याची तयारी करणार असल्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जळगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

जळगाव - शिवसेनेचे बळ जळगाव जिल्ह्यात आहे. कोणत्याही पद्धतीने निवडणुका लढण्याची तयारी आणि मानसिकता सर्व पदाधिका-यांची आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेसह लोकसभेची जागा आम्ही लढविण्याची तयारी करणार असल्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जळगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. (Shiv Sena's readiness to fight on its own, big statement of MP Sanjay Raut)राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटी संदर्भात बोलतांना ते म्हणाले की, प्रशांत किशोर हे राजकीय नेते नाहीत. त्यांनी गेल्या वेळी आमच्यासाठी तसेच काॅग्रेससाठी देखील काम केले आहे. ते व्यावसायिक राजनीतकार आहेत. जर कोणी प्रमुख नेते त्यांना भेटत असतील तर त्यांच्या पक्षाच्या विस्तारासाठी भेटली असावे. ही राजकारणातील फार मोठी उलथापालथ आहे असे मी मानत नाही. देशातील सर्व प्रादेशिक पक्षांनी एकत्र येऊन एक मजबूत आघाडी तयार करणे गरजेचे आहे. पण विरोधी पक्षाची आघाडी ही काॅग्रेस शिवाय पूर्ण होऊ शकत नाही. सध्या काॅग्रेस कमकुवत झाली असली तरी देशातील प्रमुख विरोधी पक्ष आहे. केरळ, आसाम, महाराष्ट्र, कर्नाटक यासह काही राज्यांमध्ये त्यांचे आजही चांगले संख्या बळ आहे. या संदर्भात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, ममता बॅनर्जी, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे काही प्रयत्न करीत असतील तर त्याचे दृष्य परिणाम लवकरच पहायला मिळतील. 

शिवसेनेचा विस्तार हा मुंबई-ठाण्यापर्यंतच आहे. मुंबई, ठाण्याच्या बाहेर शिवसेना जाणार नाही आसे एकेकाळी म्हटले जात होते. पण आज कोकण, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात शिवसेनेचे मोठे संघटन आहे. लवकरच ५५ चे ११० आमदार करूया. 

 शिवसेना या चार अक्षरांमध्ये चमत्कार आहे. शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानेच आपण पुढे जात आहात. जळगावमध्ये सत्तांतर होत असताना ते नगरसेवक कुठून आले, कसे आले, हे आता महत्त्वाचे नाही. आज जळगावच्या सुवर्णनगरीचा कोळसा झाला आहे. ही परिस्थिती सुधारली पाहिजे. जो उत्तम पद्धतीने महानगरपालिका चालवतो तो राज्यही चालवू शकतो. मुंबई मनपानंतर आता उद्धव ठाकरे हे राज्य चालवत आहेत, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.   

राज्यात शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद देण्याबाबत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी वक्तव्य केले आहे. याबाबत बोलताना खासदार राऊत म्हणाले की  रामदास आठवले यांना भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी हे अधिकार दिले असतील तर पहावे लागेल असे त्यांनी सांगितले. माजी खासदार नीलेश राणे यांनी खासदार राऊत हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पगारी कर्मचारी असल्याची टीका केली होती.  या टीकेला उत्तर देतांना खासदार राऊत म्हणाले की माझे घर चालविण्या पुरता मला पगार मिळत आहे. अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करायचे असते असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाJalgaonजळगावPoliticsराजकारण