शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
3
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
4
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
5
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
6
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
7
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
8
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
9
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
10
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
11
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
12
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
13
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
14
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
15
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
16
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
17
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
18
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
19
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
20
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक

विदर्भातील शिवसेनेचा वाघ जायबंदी; संजय राठोड यांची राजकीय कारकिर्द धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2021 5:59 AM

Sanjay Rathode pooja chavan case : राठोड आधी यवतमाळ जिल्ह्याच्या दारव्हा मतदारसंघातून आणि मतदारसंघ फेररचनेनंतर झालेल्या दिग्रस मतदारसंघातून निवडून येतात. राठोड हे मूळचे यवतमाळ जिल्ह्याच्या राळेगाव मतदारसंघातील पहुर इजार या गावचे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वयाच्या केवळ ५० व्या वर्षी चौथ्यांदा आमदार, राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्रीदेखील. संजय राठोड यांची अशी दमदार वाटचाल आता त्यांच्या राजीनाम्यामुळे रोखली गेली असून त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर भलेमोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

राठोड आधी यवतमाळ जिल्ह्याच्या दारव्हा मतदारसंघातून आणि  मतदारसंघ फेररचनेनंतर झालेल्या दिग्रस मतदारसंघातून निवडून येतात. राठोड हे मूळचे यवतमाळ जिल्ह्याच्या राळेगाव मतदारसंघातील पहुर इजार या गावचे. आदिवासींसाठी हा मतदारसंघ राखीव असल्याने राठोड यांनी राजकीय कारकिर्द घडविण्यासाठी आधीच्या दारव्हा मतदारसंघात जम बसविला.  गेल्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी आणि अपक्ष अशा दोन उमेदवारांचे आव्हान मोडत मोठा विजय संपादन केला होता. यवतमाळ-वाशिमच्या शिवसेना खासदार भावना गवळी या त्यांच्या पक्षांतर्गत विरोधक. पक्षातील आणि बाहेरच्या विरोधाचा सामना करीत ते राजकीय वाटचाल करीत राहिले.

देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये ते महसूल राज्यमंत्री होते. महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेच्या विदर्भातील चार आमदारांपैकी राठोड यांना वनखात्याचे कॅबिनेट मंत्रिपद मिळाले. वनखात्यातील काही निर्णयांवरूनही त्यांच्यावर टीका होत आली आहे. मात्र राठोडांचे फासे उलटे पडले ते पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाने. पूजाच्या आत्महत्येच्या एक दिवस आधी पूजा अरुण राठोड या तरुणीचा यवतमाळच्या सरकारी रुग्णालयात गर्भपात करण्यात आला. या दोन्ही पूजा एकच असल्याचे म्हटले गेले आणि संजय राठोड यांच्या अडचणी अधिकच वाढल्या. राठोड हे यवतमाळचे पालकमंत्रीदेखील होते.

पूजा चव्हाण ही बीड जिल्ह्यातील परळीला राहणारी तरुणी होती. टिकटॉक स्टार म्हणून ती अतिशय लोकप्रिय होती आणि तिचे यूट्यूबवर मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स आहेत. तिच्या आत्महत्येनंतर वनमंत्री संजय राठोड जनतेसमोर आलेच नाहीत. वनविभागाच्या एकाही बैठकीला तसेच मंत्रिमंडळ बैठकीलाही ते हजर नव्हते. एकाही आरोपाचा खुलासा त्यांनी केला नाही. बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवी संस्थानमध्ये ते २३ फेब्रुवारीला दर्शनासाठी गेले, तेव्हा त्यांनी मोठे शक्तिप्रदर्शन केले.  त्यावेळी त्यांनी पूजा आत्महत्येप्रकरणी आरोप फेटाळले होते आणि विरोधक घाणेरडे राजकारण करीत असल्याचा आरोप केला होता. राजीनाम्याची घोषणा केली तेव्हा परिवहन मंत्री अनिल परब, खा.अनिल देसाई त्यांच्यासोबत होते.

पोलीस चौकशीचा ससेमिरा कायम विदर्भातील शिवसेनेचा हा वाघ रविवारच्या राजीनाम्याने जायबंदी झाला आहे. राजीनाम्याने त्यांच्यामागचे शुक्लकाष्ट संपण्याची शक्यता नाही. कारण पोलीस चौकशीचा ससेमिरा कायम असेल. विदर्भातील शिवसेनेचा एका उमद्या नेत्याला मंत्रिपद गमवावे लागले आणि वनखाते सांभाळणारा हा नेता आता तूर्त आरोपांच्या पिंजऱ्यात पुरता अडकला आहे.

टॅग्स :Sanjay Rathodसंजय राठोडPooja Chavanपूजा चव्हाणShiv Senaशिवसेना