नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 51,18,254 वर गेला आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 97,894 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 1,132 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 83,198 लोकांना जीव गमवावा लागला आहे. महाराष्ट्रातही कोरोनाचा धोका वाढत आहे. याच दरम्यान कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात महाराष्ट्रात सरकार अपयशी ठरत असल्याची टीका करण्यात येत आहे. मात्र अशी टीका करणाऱ्यांना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी टोला लगावला आहे.
'महाराष्ट्रात अनेक लोक कोरोनातून बरे होत आहेत. महाराष्ट्र सरकारवर टीका करणाऱ्या प्रत्येकाने हे लक्षात घ्यायला हवं. लोक 'भाभीजी के पापड' खाऊन बरे होतात का?' असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. कोरोनावर आरोग्य मंत्र्यांनी केलेल्या विधानावर राऊत यांनी असा टोला लगावला आहे. तसेच आई आणि भावालाही कोरोनाची लागण झाल्याचं राज्यसभेत राऊत यांनी सांगितलं आहे.
"महाराष्ट्रात अनेक लोक कोरोनातून बरे होत आहेत. धारावीतील परिस्थितीही नियंत्रणात आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही मुंबई महापालिकेच्या कामाचं कौतुक केलं आहे. महाराष्ट्र सरकारवर टीका करणाऱ्या प्रत्येकाने या गोष्टी लक्षात घ्याव्या. सदस्यांना मला विचारायचं आहे की एवढे लोक कसे काय बरे झाले? ते काय 'भाभीजी के पापड' खाऊन बरे झाले का? ही राजकीय लढाई नसून लोकांचे जीव वाचण्याची लढाई आहे" असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. केंद्रीय मंत्री अर्जुन मेघवाल यांनी काही दिवसांपूर्वी 'पापड खाओ, कोरोना भगाओ' असा सल्ला दिला होता. मात्र त्यानंतर मेघवाल यांनाच कोरोनाची लागण झाली आहे.
देशात धोका वाढला असून कोरोनाच्या आकडेवारीने आतापर्यंतच्या रुग्णांच्या संख्येचा रेकॉर्ड मोडला आहे. गुरुवारी (17 सप्टेंबर) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात 24 तासांत कोरोनाचे 97,894 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 1,132 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 51,18,254 हजारांवर पोहोचली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 83,198 वर पोहोचला आहे. सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या देशांच्या यादीत भारत दुसऱ्या स्थानी आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Video - "या' गर्दीत कोरोना होत नाही असा सरकारचा समज आहे का?', मनसे नेत्याचा सवाल
भाजपा मंत्र्यांनी सरकारी गाडीवर लावला उलटा 'तिरंगा' अन्...
ये दोस्ती हम नही छोडेंगे! 12 वर्षांनंतर जितेंद्र आव्हाड आणि प्रताप सरनाईक एकत्र