म्हणून काँग्रेसच्या नेत्याने काँग्रेसच्याच नेत्याला बांधून घातले, नंतर बेदम चोपले; व्हिडीओ व्हायरल 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2021 03:16 PM2021-07-01T15:16:05+5:302021-07-01T15:22:44+5:30

Congress leader beats Congress leader: काँग्रेसच्या एका नेत्याने आपल्याच पक्षातील अन्य एका नेत्याला बांधून बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे.

So Congress leader beats Congress leader in Chhattisgarh, video goes viral | म्हणून काँग्रेसच्या नेत्याने काँग्रेसच्याच नेत्याला बांधून घातले, नंतर बेदम चोपले; व्हिडीओ व्हायरल 

म्हणून काँग्रेसच्या नेत्याने काँग्रेसच्याच नेत्याला बांधून घातले, नंतर बेदम चोपले; व्हिडीओ व्हायरल 

googlenewsNext

रायपूर - पक्षातील नेत्यांमधील अंतर्गत मतभेद, कुरघोडीचे राजकारण ही काँग्रेससाठी नेहमीच डोकेदुखी ठरली आहे. मात्र आता काँग्रेसच्या एका नेत्याने आपल्याच पक्षातील अन्य एका नेत्याला बांधून बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. छत्तीसगडमधील बालोद येथे हा प्रकार घडला असून,  बुघवारी घडलेल्या या घटनेनंतर मारहाणीचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (Congress leader beats Congress leader in Chhattisgarh, video goes viral )

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये बालोद येथील काँग्रेसचे नेते आणि जिल्हा परिषद सदस्य राजेश साहू आणि त्यांचे समर्थक काँग्रेसचे अन्य नेते छक्कन साहू यांना बांधून मारहाण करताना दिसत आहेत. ही संपूर्ण घटना जुन्या वादातून घडल्याचे समोर येत आहे.

काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य राजेश साहू यांच्यावर अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी पॉस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झालेला होता. या प्रकरणामध्ये छक्कन साहू हा साक्षीदार होता. या प्रकरणी जामिनावर सुटका झाल्यानंतर राजेश यांनी बुधवारी आपले समर्थक आणि कुटुंबातील महिलांसह छक्कनच्या दुकानाकडे धाव घेतली. तिथे छक्कन यांना दुकानातून बाहेर काढून पळवून पळवून त्यांना मारहाण केली.

त्यानंतर त्यांच्या दुकानासमोरच त्यांना बांधून पुन्हा मारहाण केली. एवढेच नाही तर या वादात मध्ये पडलेली छक्कन यांची पत्नी आणि मुलांनाही मारहाण करण्यात आली. दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राजेश साहू यांच्यासह इतर ९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता काँग्रेस नेत्याकडूनच काँग्रेस नेत्याची पिटाई झाल्यावर भाजपाने काँग्रेसच्या नेतृत्वाखालील छत्तीसगड सरकारला टोला लगावला आहे. माजी मंत्री अजय चंद्राकार यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, काँग्रेसशासित छत्तीसगडमध्ये काँग्रेसच्या गुंडगिरीने टोक गाठले आहे. प्रशासन लाचार आणि जनता त्रस्त आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.   

Web Title: So Congress leader beats Congress leader in Chhattisgarh, video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.