शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, उगाच नाक खुपसू नये”; संजय राऊतांची टीका
4
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
5
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
6
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
7
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
8
Maharashtra Election 2024 Live Updates: निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रकाश आंबेडकर यांच्या बॅगची तपासणी
9
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
10
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
11
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
12
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
13
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
14
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
15
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
16
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
17
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
18
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
19
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
20
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा

'मतदारसंघात गीतेंनी एकही लोकोपयोगी काम केले नाही'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2019 12:22 AM

सलग ३० वर्षे खासदार आणि दहा वर्षे केंद्रात मंत्री असणाऱ्या शिवसेनेच्या अनंत गीते यांनी रायगड लोकसभा मतदारसंघात एकही मोठे लोकोपयोगी काम केलेले नाही,

अलिबाग : सलग ३० वर्षे खासदार आणि दहा वर्षे केंद्रात मंत्री असणाऱ्या शिवसेनेच्या अनंत गीते यांनी रायगड लोकसभा मतदारसंघात एकही मोठे लोकोपयोगी काम केलेले नाही, त्यामुळे त्यांच्याकडे विकासावर बोलण्याचा कोणताच मुद्दा शिल्लक राहिलेला नाही, त्याचमुळे ते जाहीर सभेत लोटांगण घालून माझ्यावर टीका करून आपल्या निष्क्रियतेवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करत असल्याचा घणाघाती हल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांनी अलिबाग तालुक्यातील चोंढी येथील जाहीर सभेत केला.तालुक्यातील थळ, मापगाव, शहापूर आणि कुर्डूस येथील जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आघाडीतील घटक पक्ष असणाºया काँग्रेसने त्यांच्या प्रचारसभांचा कार्यक्रम आखला होता. त्यांनी या ठिकाणी प्रचार रॅली आणि झंझावती सभा घेतल्या. त्या सभांमधून तटकरे यांनी भाजप सरकार, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जबरदस्त टीकास्त्र सोडले. गेल्या ७० वर्षांमध्ये काँग्रेसने देशात काय केले, असा अपप्रचार भाजप आणि शिवसेना करत आहे. याचा समाचार घेताना तटकरे म्हणाले, विविध कंपन्या, शेती क्षेत्रामध्ये अन्नधान्य आयात करणारा अशी ओळख पुसून तो निर्यात करणारा देश अशी केली. संगणक, मोबाइल हे सर्व काँग्रेसच्या राजवटीत घेतलेले निर्णय आहेत. भाजप सरकारेन जनतेला फसवण्याचे काम केले आहे.

देशाला आज धर्मनिरपेक्ष विचारांची आणि सरकाची गरज आहे. देशात परिवर्तन करण्यासाठी भाजपला सत्तेतून खाली खेचा, असे आवाहन त्यांनी केले. भाजप सरकाने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न सोडवलेला नाही, त्यांच्या मालाला आधारभूत किंमत त्यांना देता आलेली नाही. पीक विम्यात भाजप सरकारने भ्रष्टाचार केला आहे, अशी टीका त्यांनी केली.
युतीचे उमेदवार गीते यांनी रायगड मतदारसंघात विकास केलेला नाही. दिवेआगर, मुरुड, माणगाव, गोरेगाव या ठिकाणी विविध कंपन्यांचा सीएसआर फंड घेऊन तेथे फक्त सार्वजनिक शौचालय उभारण्याचे काम केले. मी आणलेला विकासनिधी त्यांनी आणल्याचे खोटे सांगण्याचा ‘उद्योग’ अवजड उद्योगमंत्र्यांनी सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. गीतेंनी केलेली कामे मी दुर्बीण लावून शोधत असल्याची मार्मिक टीकाही त्यांनी केली.अवजड उद्योगमंत्री म्हणून काँग्रेसचे तत्कालीन दिवंगत केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांनी लातूर येथे तब्बल १२०० कोटी रुपयांची गुंतवणूक आणून तेथे कंपनी उभारली, तसेच त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन केंद्रीय अवजड उद्योगमंत्री प्रफुल्ल पटेल यांनीही गोंदियामध्ये कंपनी उभारून हजोरो बेराजगार तरुणांच्या हाताला काम दिले. मात्र, गीते यांना ती किमया साधता आली नाही. त्यांनी फक्त रेल्वे आणण्याचे आणि रोहे आणि रत्नागिरी येथे पेपर इंडस्ट्री आणण्याच्या फक्त घोषणाच केल्या. आरसीएफच्या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न ते अद्याप सोडवू शकलेले नाहीत, असे असतानाही ते त्याच प्रकल्पग्रस्तांना प्रश्न सोडवण्याचे आश्वासन देऊन पुन्हा मते मागत असल्याची टीका तटकरे यांनीकेली.१९९५ साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे रिमोटकंट्रोल असल्याने भाजप त्यांचे ऐकत होती, आता मात्र चित्र उलटे झाले आहे. शिवसेना भाजप सोबत फरफरटत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांना अफजल खानाची उपमा दिली, तर मोंदीना चौकीदार चोर आहे, असे संबोधल्याची आठवण त्यांनी करून दिली. भाजप सरकारच्या कालावधीत महिला, दलित यांच्यावरील अत्याचारात वाढ झाली आहे. बेरोजगारांचा प्रश्न आकाशाला भिडला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पर्यटन उद्योग, रेवस-रेड्डी सागरी मार्ग पूर्ण करण्याबाबत मंत्री असताना दिलेला शब्द खरा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.याप्रसंगी काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर, सुनील थळे, राजा ठाकूर यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019raigad-pcरायगडAnant Geeteअनंत गीते