शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

मागच्या सरकारवर खापर कशाला? इंधन दरवाढीवरून सोनिया गांधींचे पंतप्रधानांना खरमरीत पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2021 6:56 PM

Sonia Gandhi Letter to Modi: सोनियांनी लिहिलेल्या पत्रामध्ये पेट्रोल, डिझेलची दरवाढ ही 'ऐतिहासिक आणि अव्यवहारिक' असल्याचे सांगत वाढते दर मागे घेण्याची मागणी केली आहे.

देशातील वाढत्या पेट्रोल, डिझेलच्या किंमतींना आपण नाही तर युपीए सरकार जबाबदार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते. यावर मग गेल्या सात वर्षांत तुम्ही का बदल केला नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींना झापले असताना आता काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi ) यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) खरमरीत पत्र लिहिले आहे. (Sonia Gandhi Letter to Modi on petrol, diesel Price hike.)

सोनियांनी लिहिलेल्या पत्रामध्ये पेट्रोल, डिझेलची दरवाढ ही 'ऐतिहासिक आणि अव्यवहारिक' असल्याचे सांगत वाढते दर मागे घेण्याची मागणी केली आहे. मोदी सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे देशातील इंधनाच्या किंमती बेफाम वाढत आहेत. दुसरीकडे जीडीपी गटांगळ्या खात आहे. मात्र, केंद्र सरकार याचे खापर मागच्या सरकारांवर फोडण्यासाठी उतावीळ झाली आहे. सरकारने हे वाढते दर मागे घ्यावेत आणि सामान्य, नोकरदार, शेतकरी, गरिबांना याचा फायदा पोहोचवावा, अशी मागणी केली आहे. 

सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर गंभीर टीका केली आहे. लोकांच्या त्रासातून फाय़दा कमवत असल्याचा आरोप केला आहे. ईंधन आणि गॅसच्या वाढत्या किंमतीमुळे देशातील प्रत्येक नागरिकाला त्रास होत आहे. हे सांगण्यासाठीच मी तुम्हाला पत्र लिहित असल्याचे सोनिया यांनी म्हटले आहे. 

एकीकडे भारतात नोकऱ्या, कमाई, आणि घरोघरीचे उत्पन्न कमी होत चालले आहे. मध्यम वर्ग आणि सामान्य लोक रोजीरोटी कमावण्यासाठी संघर्ष करत आहेत. या त्यांच्यासमोरील आव्हानात आता वाढत्या इंधनामुळे घरगुती साहित्य, अन्न-धान्यांच्या किंमतीतही अभूतपूर्व वाढ होत आहे. या त्रासाच्या काळातही केंद्र सरकार लोकांच्या त्रासातून फायदा कमावण्याचा मार्ग निवडत असल्याचे दु:ख वाटत असल्याचे सोनिया यांनी म्हटले आहे.

पवार काय म्हणालेले...

केंद्रात गेली सहा वर्षे तुमचे सरकार आहे. ठीक आहे, आमच्याकडून चुका झाल्या. तर सहा वर्षांत त्या दुरुस्त करता आल्या नाहीत का, असा सवाल करीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांना टोला लगावला आहे. पंतप्रधान मोदी यांनी पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किमतीला यूपीए सरकारचे त्यावेळचे धोरण कारणीभूत असल्याचा आरोप केला आहे, याबाबत विचारणा केल्यावर पवार म्हणाले की, केंद्र सरकारमध्ये सहा वर्षे सत्तेत असतानादेखील चुका दुरुस्त  करता येत नसतील, तर त्यावर चर्चा काय करायची?

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीPetrolपेट्रोलDieselडिझेलcongressकाँग्रेस