प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती होताच सिद्धूंनी अमरिंदर सिंग यांना दिला मोठा धक्का, कॅप्टनच्या गटाला लावला सुरुंग?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 01:51 PM2021-07-21T13:51:52+5:302021-07-21T13:53:33+5:30

Navjot Singh Sidhu News: पंजाबमध्ये मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्यात सुरू असलेल्या वर्चस्वाच्या लढाईत आता सिद्धूंचे पारडे जड होताना दिसत आहे.

As soon as he was appointed as the state president, Sidhu gave a big shock to Amarinder Singh. | प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती होताच सिद्धूंनी अमरिंदर सिंग यांना दिला मोठा धक्का, कॅप्टनच्या गटाला लावला सुरुंग?

प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती होताच सिद्धूंनी अमरिंदर सिंग यांना दिला मोठा धक्का, कॅप्टनच्या गटाला लावला सुरुंग?

googlenewsNext

चंदिगड - पंजाबमध्ये मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग (Amarinder Singh) आणि नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्यात सुरू असलेल्या वर्चस्वाच्या लढाईत आता सिद्धूंचे पारडे जड होताना दिसत आहे. अमृतसरमध्ये नवज्योत सिंग सिद्धू यांच्या (Navjot Singh Sidhu) निवासस्थानी आज काँग्रेसच्या ६० आमदारांनी हजेरी लावली. त्यामुळे सिद्धू यांनी अमरिंदर सिंग यांच्या गटाला मोठा सुरुंग लावल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार सिद्धू यांनी दिलेल्या निमंत्रणानंतर सुवर्ण मंदिरात दर्शनासाठी जाण्याच्या कार्यक्रमाला काँग्रेसच्या एकूण ८० पैकी ६० आमदारांनी हजेरी लावली. त्याशिवाय अनेक जिल्ह्यांमधील अध्यक्ष, निगम आमि बोर्डाचे चेअरमनसुद्धा सिद्धूच्या घरी दाखल झाले. (As soon as he was appointed as the state president, Sidhu gave a big shock to Amarinder Singh.)

सिद्धूसोबत आमदारांनी जाऊ नये यासाठी कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी दबाव बनवला होता. मात्र तरीही अनेक आमदार आणि पक्षाचे नेते कॅप्टन यांच्या घरी पोहोचले. तसेच अमरिंदर सिंग यांच्या मंत्रिमंडळातील तीन कॅबिनेट मंत्रीसुद्धा सिद्धूंच्या घरी गेले. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इकतर कॅबिनेट मंत्री सिद्धू यांच्या निमंत्रणानंतरही कॅप्टन यांचा दबाव असल्याने सुवर्ण मंदिर दर्शनाच्या कार्यक्रमाला गेले नाहीत. दुसरीकडे सिद्धू यांनी शक्तिप्रदर्शन करण्यासाठी घरी दोन व्होल्व्हो बस बोलावल्या होत्या. या व्होल्व्हो बसमध्ये आमदारांना बसवून शक्तिप्रदर्शन करण्याचा सिद्धूंचा मानस आहे.

नवज्योत सिंग सिद्धू यांनी पक्षाच्या आमदारांना अमृतसर येथील आपल्या निवासस्थानी नाश्त्यासाठी बोलावले होते. दुसरीकडे परगट सिंग यांनी सांगितले की, सिद्धूंनी का माफी मागितली पाहिजे. ही काही सार्वजनिक बाब नाही आहे. मुख्यमंत्र्यांनी अनेक मुद्द्यांवर समाधानकारक तोडगा काढलेला नाही. अशा परिस्थितीत त्यांना जनता माफ करणार नाही.   
 

Web Title: As soon as he was appointed as the state president, Sidhu gave a big shock to Amarinder Singh.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.