मुंबई – काँग्रेस नेते संजय निरुपम यांच्यावर पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवण्यात आला आहे. निरुपम यांना पक्षातून बाहेर काढा अशी शिफारस मुंबई काँग्रेस अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी हायकमांडला केल्याची माहिती आहे. राजस्थानमध्ये सचिन पायलट यांच्या बंडखोरीच्या प्रकारानंतर पक्षांतंर्गत शिस्तभंग करणाऱ्या नेत्यांविरोधात ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्याचे पडसाद इतर राज्यातही उमटताना दिसत आहेत.
या बातमीवर संजय निरुपम यांनी भाष्य केले आहे. संजय निरुपम यांनी ट्विट करत म्हटलंय की, शिवसेना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करावी अशी मागणी मी केली. शिवसेनेच्या विरोधात बोलणं पक्षविरोधी कारवाया आहेत का? मुंबई काँग्रेसचं शिवसेनेत विलिनीकरण झालंय का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
तसेच युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी ट्विटरवरुन व्यक्त केलेल्या नाराजीवरुनही निरुपम यांनी भाष्य केले. महाजॉब्स पोर्टलच्या जाहिरातीचा फोटो ट्विट करत त्यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये काँग्रेस सहभागी आहे असं ऐकलं ना? मग युवकांना रोजगार देणाऱ्या सरकारी जाहिरातीत काँग्रेस कुठे आहे? ज्या काँग्रेस नेत्यांना शिवसेनेवर अथांग प्रेम झालं आहे. त्यांना माझे प्रश्न आहेत. शिवसेनेसमोर लोटांगण घालण्यापेक्षा त्यांच्याशी लढा अन्यथा पक्ष संपून जाईल असा दावा संजय निरुपम यांनी केला आहे.
तर दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते संजय झा यांचंही पक्षात निलंबन करण्यात आलं होतं, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने याबाबत ट्विट करुन माहिती दिली होती. त्यावर संजय झा यांनी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना प्रश्न विचारला आहे. कोणत्याही प्रकारची नोटिस न देता मला म्हणणं मांडायची संधी न देता माझं निलंबन करण्यात आलं. ही पक्षांतंर्गत लोकशाही आहे का?
कोण आहेत संजय निरुपम?
संजय निरुपम यांनी पत्रकारिता सोडून शिवसेनेत प्रवेश केला. १९९६ मध्ये ते शिवसेनेकडून राज्यसभेचे खासदार होते, पण नंतर ते शिवसेना सोडून कॉंग्रेसमध्ये दाखल झाले. कॉंग्रेसनेही त्यांना राज्यसभेवर उमेदवारी दिली. २००९ मध्ये त्यांनी मुंबई उत्तर जागेवरुन लोकसभा निवडणुका जिंकली. परंतु २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपाच्या गोपाळ शेट्टी यांनी निरुपम यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. २०१७ ते २०१९ या काळात ते मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्षही होते.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
११ हजार भरा अन् ग्रामपंचायतीवर प्रशासक व्हा; चौफेर टीकेनंतर राष्ट्रवादीनं वादग्रस्त पत्र मागे घेतले
खळबळजनक! भाजपा नेत्याच्या कुटुंबातील ६ जणांची तलवारीनं हत्या; मृतांमध्ये २ लहान मुलांचा समावेश
८ वर्ष बांधकाम अन् २६४ कोटी खर्च करुन फक्त २९ दिवसात कोसळला गोपाळगंजचा महासेतू पूल!
"महाजॉब्स योजना शिवसेना-राष्ट्रवादीची आहे की महाविकास आघाडीची?"; काँग्रेसची थेट नाराजी
निर्दयी! मध्य प्रदेशात पोलिसांनी गरीब शेतकरी दाम्पत्याला बेदम मारलं; लहान मुलांनाही सोडलं नाही
…तर १९१८ च्या इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची गंभीर शक्यता; कोरोनाबाबत तज्ज्ञांचा मोठा दावा