पिंपरी : मावळ मतदार संघाची निवडणूक २९ एप्रिल रोजी होत आहे. राज्यात शेवटच्या टप्प्यात निवडणूक होणाऱ्या या लोकसभा मतदार संघाकडे स्टार प्रचारक व बड्या नेत्यांनी आपला मार्चा वळवला आहे. सर्वच पक्षांकडून नेत्यांच्या सभा, रोड शो, रॅलीचे आयोजनाची तयारी सुरू आहे.मावळ लोकसभेच्या वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजाराम पाटील यांच्यासाठी डॉ. प्रकाश आंबेडकर यांची रविवारी देहूरोडला सभा झाली. पुणे आणि बारामतीतील निवडणुकीनंतर भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसचे स्टार प्रचारक व नेत्यांचा ताफा शिरूर व मावळकडे वळवला आहे. त्यामुळे बड्या नेत्यांसह दुसºया आणि तिसºया फळीतील नेतेही या मतदारसंघांमध्ये प्रचारासाठी डेरेदाखल होत आहेत. अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्तेही कोपरा सभा, रॅली, मेळावे आदींमध्ये सहभागी होणार आहेत. त्यामुळे शेवटच्या पाच दिवसांत प्रचाराचा ज्वर चढणार आहे.महायुतीतर्फे मंगळवारी सायंकाळी पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आदित्य ठाकरे यांचा आदित्य संवाद कार्यक्र म झाला. गुरुवारी (२५ एप्रिल) उद्धव ठाकरे यांची काळेवाडी फाटा येथे सभा होईल. त्याच दिवशी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची पनवेल येथे सभा होणार आहे. त्यानंतर शनिवारी (२७ एप्रिल) आमदार गुलाबराव पाटील यांची पवनमावळात सकाळी १० च्या सुमारास, तर दुपारी ३ ला चिंचवडेनगरमधील दगडोबा चौकात शिवसेनेतर्फे प्रचाराची सांगता सभा होणार आहे. पालकमंत्री गिरीश बापट, पंकजा मुंडे यांच्यासह अन्य नेत्यांच्या सभा आयोजित करण्याबाबतचे नियोजन सुरू आहे. त्यासाठी शिवसेनेच्या शहर कार्यालयात मंगळवारी पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे.महाआघाडीतर्फे ही बड्या नेत्यांच्या सभांचे आयोजन करण्यात येत आहे. बुधवारी (२४ एप्रिल) चिंचवड विधानसभा मतदारसंघातील सांगवी येथून सुप्रिया सुळे यांचा ‘रोड शो’ होईल. बुधवारी काँग्रेसचे हर्षवर्धन पाटील यांची चिंचवड विधानसभा मतदारसंघात सभा होईल. गुरुवारी (२५ एप्रिल) धनंजय मुंडे यांची सकाळी दहाच्या सुमारास काळेवाडीत आणि दुपारी २ ला दापोडीत सभा होईल. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात गुरु वारी सायंकाळी इंटकच्या मेळाव्याला राष्ट्रीय अध्यक्ष संजीवा रेड्डी उपस्थित राहतील. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे शेवटच्या टप्प्यात घाटाखालील मतदारसंघात सभा घेणार आहेत.
स्टार प्रचारकांचा मावळकडे मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 12:50 AM