शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
2
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
4
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
6
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
7
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
8
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
9
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
10
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
11
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
12
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
13
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
14
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
15
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
16
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
17
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
18
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
19
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
20
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला

टोलवाटोलवी नको; केंद्राची वाट न पाहता राज्य सरकारनं मदत जाहीर करावी- फडणवीस 

By कुणाल गवाणकर | Published: October 19, 2020 11:27 AM

Devendra Fadnavis: सगळंच केंद्रावर ढकलायचं असेल, तर मग राज्य सरकार कशासाठी?; फडणवीसांचा सवाल

बारामती: अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारनं तातडीनं मदत जाहीर करावी. केंद्र सरकार राज्याला सहाय्य करेलच. पण राज्य सरकारनं टोलवाटोलवी न करता आधी मदतीची घोषणा करावी, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. केंद्राची वाट न पाहता राज्य सरकारनं मदत द्यावी. सोयीस्कर भूमिका घेऊ नये. सगळंच केंद्रावर ढकलायचं असेल, तर मग राज्य सरकार कशासाठी आहे, त्यांचं काम काय, असे प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केले. अतिवृष्टीचा फटका बसलेल्या भागांची पाहणी करण्यासाठी बारामतीत आले असताना फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला.'सोयीस्कर राजकीय भूमिका कोणीच घेऊ नये. मदत कशी मिळते हे सगळ्याच नेत्यांना माहिती आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना टोलवाटोलवी नको. पंचनाम्यांच्या भानगडीत न पडता राज्य सरकारनं शेतकऱ्यांना तातडीनं मदत जाहीर करावी. केंद्र सरकार मदत करेलच. पण पहिली जबाबदारी राज्य सरकारची आहे. त्यामुळे राज्यानं तातडीनं मदत करावी. राज्य सरकारनं केंद्राच्या मदतीची वाट बघत राहू नये. ते स्वत: काय करणार ते त्यांनी सांगावं,' असं फडणवीस म्हणाले. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यात वाद; गावकऱ्यांना पूल पार करुन यायला सांगितल्यानं नाराजी अन् संतापमुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नसल्याची टीका भाजप नेत्यांकडून वारंवार केली जात आहे. यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांचा बचाव केला. बाकीचे नेते, मंत्री प्रत्यक्ष फिल्डवर जातील. परिस्थितीचा आढावा घेतील आणि त्याची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली जाईल, अशी कार्यपद्धती आम्ही ठरवली असल्याचं पवार यांनी आज सांगितलं. त्यावर सरकार अपयशी ठरत असल्यानं पवारांना बचाव करावा लागतो, असं प्रत्युत्तर फडणवीसांनी दिलं.“मुख्यमंत्री ६ महिन्याने घराबाहेर पडणार ही ब्रेकिंग न्यूज असेल तर महाराष्ट्रासाठी दुसरं दुर्दैव काय”'शरद पवारांना सरकारला पाठिशी घालावं लागत आहे. या सरकारला पाठिशी घालणं एवढचं काम शरद पवारांकडे आहे. राज्य सरकारविरोधात लोकांमध्ये असंतोष आहे. आमचा दौरा घोषित होईपर्यंत कोणताही पालकमंत्री जिल्ह्याकडे फिरकला नव्हता. आम्ही दौरा करायला लागल्यामुळे सगळेजण आता घराबाहेर पडले आहेत,' असं फडणवीस म्हणाले.शहाण्याला पुरेसा असतो शब्दांचा मार; शरद पवारांकडून राज्यपालांचा मोजक्या शब्दांत समाचारराज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी राज्यातली मंदिरं खुली करण्यावरून मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं खरमरीत पत्र आणि त्यावरून शरद पवारांनी राज्यपालांवर केलेली टीका यावरही फडणवीस यांनी भाष्य केलं. 'राज्यपालांचं एखादं वाक्य आणि त्यावरून वाद होण्याची ही काही पहिली वेळ नाही. राज्यपालांसोबत मतभेद असतील. ते यापुढे होतील. पण आता शेतकऱ्यांना काय मदत मिळणार हे पाहणं गरजेचं आहे, असं फडणवीस पुढे म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी