काँग्रेसमधील वादळ संपलेले नाही, थांबलेय; पत्र लिहिणाऱ्या नेत्यांकडून के.सी.वेणुगोपाल टार्गेट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 02:31 AM2020-08-26T02:31:07+5:302020-08-26T06:49:09+5:30
या नेत्यांचा संशय वेणुगोपाल यांच्यावर होता. बैठकीत उपस्थित सदस्यानुसार सोनिया गांधी यांनी पत्र वाचल्यानंतर राहुल गांधींना पाठवले होते.
शीलेश शर्मा
नवी दिल्ली : काँग्रेसच्या २३ नेत्यांनी लिहिलेल्या पत्रावरून निर्माण झालेले वादळ शांत होताना दिसत नाही. सूत्रांनुसार नेतृत्वावरून प्रश्न उपस्थित करणाºया नेत्यांच्या निशाण्यावर आता पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल आले आहेत. याचे संकेत सोमवारी रात्री मिळाले.
कार्यकारिणी समितीच्या बैठकीनंतर गुलामनबी आझाद यांच्या निवासस्थानी आनंद शर्मा, शशी थरूर, मुकुल वासनिक,कपिल सिब्बल,मनीष तिवारी यांच्यासारख्या आवाज उठवणाºया नेत्यांनी बैठक घेऊन कार्यकारिणी समितीच्या बैठकीतील निर्णयांवर चर्चा केली.
या चर्चेत के. सी. वेणुगोपाल हे लक्ष्य होते. बैठकीतील एका सदस्याने सांगितले की, पूर्ण चर्चा यावर केंद्रीत होती की, जे पत्र सोनिया गांधी यांना लिहिले गेले होते ते प्रसारमाध्यमांपर्यंत गेलेच कसे? कारण त्याची प्रत स्वाक्षरी करणाऱ्यांकडे नव्हती. याचा खुलासा आझाद यांनी कार्यकारिणीसमितीच्या बैठकीतही केला होता.
या नेत्यांचा संशय वेणुगोपाल यांच्यावर होता. बैठकीत उपस्थित सदस्यानुसार सोनिया गांधी यांनी पत्र वाचल्यानंतर राहुल गांधींना पाठवले होते. राहुल यांनी ते वेणुगोपाल यांना पाठवले म्हणजे कार्यकारिणी समितीची बैठक त्या पत्रासाठीच बोलावली जावी. के. सी. वेणुगोपाल यांनी हेतूत: कार्यकारिणी समितीच्या बैठकीच्या आधी दिल्लीतील एका इंग्रजी भाषिक दैनिकाच्या बातमीदाराला (हा बातमीदार वेणुगोपाल यांच्या जुन्या परिचयाचा आहे) पत्राची प्रत दिली म्हणजे जे मुद्दे पत्रात उपस्थित केले गेले त्यावर चर्चा न होता पत्र सार्वजनिक झाले या मुद्यावर केंद्रित व्हावी म्हणून. कार्यकारिणी समितीच्या निर्णयाला हा नेता स्वत:चा मोठा विजय समजत आहे.
निवडणूक होईपर्यंत संघर्ष सुरू राहणार
- नेत्यांचा उद्देश जोपर्यंत पक्षात संसदीय मंडळाची स्थापना व कार्यकारिणी समितीची निवडणूक होत नाही तोपर्यंत संघर्ष सुरूच ठेवण्याचा आहे.
- या दरम्यान हा नेता हे पत्र कसे बाहेर गेले याचा तपास लावेल व तो बाहेर जाऊ देण्यात कोणाकोणाची भूमिका होती हे शोधेल.
- कपिल सिब्बल, विवेक तन्खा आणि मुकुल वासनिक टष्ट्वीटद्वारे इशारा देत आहेत की, वादळ संपलेले नाही तर फक्त थांबले आहे.
- कारण हा मुद्यांचा प्रश्न आहे पद मिळवण्याचा नाही. दुसरीकडे काँग्रेसचे अगदी वरिष्ठ नेतृत्व वाद संपला आहे, असे समजून चालले आहे.