नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर काढलेला ‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपट निवडणूक आयोगाने पूर्ण पाहावा आणि सध्याच्या निवडणूक काळात त्याचे जाहीर प्रदर्शन केले जाऊ शकते का, याविषयीचे त्यांचे मत सीलबंद लखोट्यातून येत्या शुक्रवारपर्यंत सादर करावे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिले.सेन्सॉर बोर्डाने प्रमाणपत्र देऊनही निवडणूक आयोगाने बंदी घातल्याने गेल्या आठवड्यात या चित्रपटाचे नियोजित प्रदर्शन होऊ शकले नव्हते. आयोगाने ही बंदी फक्त मोदी चित्रपटावर घातली नव्हती तर ज्याने एखाद्या पक्षास प्रचारात झुकते माप मिळेल अशा कोणत्याही राजकीय नेत्याविषयीच्या चरित्रात्मक साहित्याचे कोणत्याही माध्यमातून प्रसारण करण्यास ही सरसकट बंदी घालण्यात आली होती.
‘मोदी’ चित्रपट पाहून आम्हाला सीलबंद अहवाल सादर करा- सुप्रीम कोर्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 03:53 IST