अमृतसर: उत्तर प्रदेशप्रमाणे पुढील वर्षी पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी विविध पक्षांनी आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. भाजपमधून काँग्रेसमध्ये गेलेल्या नवज्योत सिंग सिद्धू यांची नाराजी चर्चेचा विषय ठरत आहे. नवज्योतसिंग सिद्धू यांनी प्रियंका गांधींची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहे. मात्र, या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबिरसिंग बादल यांनी नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर टीका केली असून, ते एक भरकटलेले मिसाइल असल्याचा टोला लगावला आहे. (sukhbir singh badal says navjot singh sidhu is a misguided missile that is not under control)
भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर नवज्योतसिंग सिद्धू यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र, मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांचे सूर कधी जुळलेच नसल्याचे पाहायला मिळत आहे. निवडणुका जवळ येतायत तसे आता सिद्धू उघडणपणे कॅप्टन अमरिंदर सिंगाच्या कारभारावर टीका करताना दिसत आहेत. तर, सिद्धूंवर आता शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबिरसिंग बादल यांनी निशाणा साधला आहे.
डॉक्टरांची ड्युटीला दांडी; ऑक्सिजन पातळी खालावल्याने तडफडून १२ रुग्णांचा मृत्यू
नवज्योतसिंग सिद्धू हे एक भरकटलेलं मिसाइल
नवज्योतसिंग सिद्धू हे एक भरकटलेले मिसाईल आहे. या मिसाईलवरचे नियंत्रण सुटलेले आहे. हे मिसाईल कुठल्याही दिशेने जाऊ शकते. ते स्वत:वरही आघात करू शकते. पंजाबला अभिनय करणाऱ्या व्यक्तीची नाही. तर, राज्याच्या विकासाविषयी विचार करणाऱ्या व्यक्तीची गरज आहे, अशी टीका सुखबिरसिंग बादल यांनी केली आहे.
नवज्योतसिंग सिद्धूंचा पलटवार
तुमचे भ्रष्ट व्यवसाय उद्ध्वस्त करण्यासाठी मी पूर्णपणे गाइडेड आणि केंद्रीत आहे. पंजाबमध्ये बनलेले तुमचे सुखवस्तू आवास पंजाबच्या गरीबांसाठी सार्वजनिक शाळा आणि हॉस्पिटलमध्ये रुपांतरीत होत नाहीत, तोपर्यंत मी झुकणार नाही, असा पलटवार नवज्योतसिंग सिद्धू यांनी केला आहे.
कोरोना लस म्हणून दिले मिठाचे पाणी! तपासात धक्कादायक खुलासे; १० जणांना अटक
दरम्यान, नवजोतसिंग सिद्धू यांनी प्रियंका गांधी यांची भेट घेतली. त्यानंतर प्रियंका गांधी राहुल गांधींच्या भेटीसाठी त्यांच्या घरी गेल्या. त्यांनी राहुल यांच्याशी कॉंग्रेसमध्ये सुरू असलेल्या वादावर चर्चा केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंतर घरी परतल्यावर प्रियंका गांधी यांनी पुन्हा नवज्योतसिंग सिद्धू यांच्याशी चर्चा केल्याची माहिती मिळाली आहे.