माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांना त्यांचे गाणे आले की किंवा त्यांच्या गाण्याची घोषणा झाली की सोशल मीडियावर खूप ट्रोल केले जाते. त्यांचे वक्तव्यांनाही ट्रोल केले जाते. या ट्रोलर कार्यकर्त्यांचा देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार समाचार घेतला. (Who is trolling on Amruta Fadanvis Songs on Social Media; Devendra Fadnavis told Shivsena.)
लोकमतच्या सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. अमृता फडणवीसांना Amruta Fadnavis काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचे कार्यकर्तेच ट्रोल करतात. स्री दाक्षिण्य वगैरे यांच्यासाठी केवळ भाषणात बोलायचे मुद्दे असल्याची चपराक फडणवीस यांनी लगावली. तसेच ट्रोलर्सला कसं उत्तर द्याल याबाबत विचारलं असता येत्या ८ मार्चला नवं गाणं येतंय असं म्हणून अमृता यांनी ट्रोलर्सकडे लक्ष देण्याची गरज वाटत नसल्याचं म्हटलं.
देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंसाठी 'डेडिकेट' केलं बॉलिवूडमधील गाणं; तुम्हीच पाहा कोणतं!
पूजा चव्हाण प्रकरण सीबीआयकडे सरकारनं द्यायला हवं का? याबाबत विचारलं असता फडणवीसांनी जोरदार टीका केली. हे सरकार पोलिसांवरच इतका दबाव आणून प्रकरण दाबतंय ते सीबीआयकडे काय देणार असं फडणवीस म्हणाले.
संगीत क्षेत्रातील सर्वोत्कृष्टतेचा गौरव करणारा सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार सोहळा आज सायन येथील षण्मुखानंद सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत रंगतोय. या सोहळ्यात ख्यातनाम गायक, संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांचा सूर ज्योत्स्ना सरस्वती पुरस्कार देऊन सन्मान केला जाणार आहे; तसेच उदयोन्मुख गायक-गायिका प्रथमेश लघाटे आणि हरगून कौर यांचा सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. लोकमत सखी मंचच्या संस्थापक आणि संगीतसाधक ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतीनिमित्त लोकमत मीडिया ग्रुपतर्फे सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार दिले जातात.
पूजा चव्हाण प्रकरण हे सरकार सीबीआयकडे काय देणार; देवेंद्र फडणवीसांचा खोचक सवाल