राज्यातील सत्ताकारणात तिसरा पक्ष ठरलेल्या काँग्रेसला तुलनेने दुय्यम मंत्रिपदे मिळाली. नेहमीप्रमाणे उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीकडे गेले. आघाडीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्रीपद असलेल्या काँग्रेसला यावेळी उपमुख्यमंत्रपद मिळाले नाही. यावर माजी मुख्यमंत्री आणि माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्पष्ट मत मांडले आहे. (Will Congress Get's Deputy CM Post?)
संगीत क्षेत्रातील सर्वोत्कृष्टतेचा गौरव करणारा सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार सोहळा आज सायन येथील षण्मुखानंद सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत रंगतोय. या सोहळ्यात ख्यातनाम गायक, संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांचा सूर ज्योत्स्ना सरस्वती पुरस्कार देऊन सन्मान केला जाणार आहे; तसेच उदयोन्मुख गायक-गायिका प्रथमेश लघाटे आणि हरगून कौर यांचा सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. लोकमत सखी मंचच्या संस्थापक आणि संगीतसाधक ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतीनिमित्त लोकमत मीडिया ग्रुपतर्फे सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार दिले जातात.
उपमुख्यमंत्री पद काँग्रेसला मिळेल का, असा सवाल त्यांना विचारण्यात आला. यावर त्यांनी राजकारणात जी चर्चा असते ते कधीच होत नाही, यामुळे काँग्रेसला उपमुख्यमंत्री पद मिळेल असे काही नाही, असे म्हणत त्यांनी चर्चा थेट फेटाळून लावली. अशीच काहीशीप्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. आम्ही समाधानी पण राजकारणात अशा चर्चा होतच असतात. पद दुय्यम असतं पण जनतेच्या प्रश्नांसाठी महत्वाचं असतं असंही ते म्हणाले.