काही दिवसांपूर्वी काँग्रेसदेखील उपमुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या होत्या. दरम्यान, यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री छगन भुजबळ यांनी या केवळ चर्चाच असल्याचं म्हटलं होतं. दरम्यान, उपमुख्यमंत्रीपदाच्या चर्चेबाबत बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat यांनी आनंदी आनंद गडे असं म्हणत थेट बोलणं टाळलं. राज्यात कांग्रेसला उपमुख्यमंत्रीपद मिळणार का? याबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते."आम्ही समाधानी आहोत. परंतु राजकारणात अशा चर्चा होतच असतात. पद दुय्यम असतं. पण जनतेच्या प्रश्नांसाठी महत्वाचंही असतं," अस थोरात म्हणाले. यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनादेखील काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद देण्याबाबत सवाल करण्यात आला होता. यावर बोलताना त्यांनी या केवळ चर्चा असल्याचं म्हटलं होतं. तर महाविकास आघाडीत वर्षभरानंतर बदलांचे वारे वाहू लागल्याच्या चर्चा सुरू होत्या. यादेखील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी फेटाळून लावल्या होत्या.
संगीत क्षेत्रातील सर्वोत्कृष्टतेचा गौरव करणारा सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार सोहळा आज सायन येथील षण्मुखानंद सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत रंगतोय. या सोहळ्यात ख्यातनाम गायक, संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांचा सूर ज्योत्स्ना सरस्वती पुरस्कार देऊन सन्मान केला जाणार आहे. तसेच उदयोन्मुख गायक-गायिका प्रथमेश लघाटे आणि हरगून कौर यांचा सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. लोकमत सखी मंचच्या संस्थापक आणि संगीतसाधक ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतीनिमित्त लोकमत मीडिया ग्रुपतर्फे सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार दिले जातात.