शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
काय आहे शिमला करार? पाकिस्तान देतोय रद्द करण्याची धमकी; सोप्या भाषेत समजून घ्या...
4
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
5
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
6
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
7
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
19
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
20
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'

SurJyotsna Awards 2021: राज्यपालांकडून एकही असंवैधानिक कृत्य नाही; देवेंद्र फडणवीसांनी 'विमाना'वरून सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2021 19:24 IST

Devendra Fadanvis Talk on Governor-Government allegations on Airplane : राज्यपाल कोश्य़ारी यांना उत्तराखंडला एका कार्यक्रमाला जायचे होते. यासाठी सकाळी ते विमानात देखील जाऊन बसले परंतू त्यांना मुख्यमंत्री कार्यालयातून विमान नेण्यास परवानगी नसल्याचे सांगण्यात आल्याने त्यांना विमानातून उतरावे लागले. नंतर ते खासगी विमानाने उत्तराखंडला पोहोचले.

गेल्या आठवड्यात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना राज्य सरकारने विमान नाकारल्यावरून राजकारण तापले होते. शिवसेना विरोधात भाजपा असे द्वंद्व रंगले होते. यावर आता माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना आणि सरकारवर टीका केली आहे. (Devendra Fadanvis Talk on Governor-Government allegations on Airplane)

राज्यपाल कोश्य़ारी यांना उत्तराखंडला एका कार्यक्रमाला जायचे होते. यासाठी सकाळी ते विमानात देखील जाऊन बसले परंतू त्यांना मुख्यमंत्री कार्यालयातून विमान नेण्यास परवानगी नसल्याचे सांगण्यात आल्याने त्यांना विमानातून उतरावे लागले. नंतर ते खासगी विमानाने उत्तराखंडला पोहोचले. यावर शिवसेनेने खासगी कार्यक्रमांना सरकारी विमान कसे मिळेल, असे कारण देत भाजपाच्या आरोपांना उत्तर देण्यात आले होते. यावर आता फडणवीस यांनी राज्यपालांची बाजू मांडली आहे. 

SurJyotsna Awards 2021: 'त्या' प्रश्नावर बाळासाहेब थोरात हसत हसत म्हणाले, 'आनंदी आनंद गडे'राज्यपालांनी एकही असंवैधनिक कृत्य केलेलं नाही. राज्याचं सरकार सारंकाही स्वत:च्या मालकीचं असल्यासारखं वागतेय, असा आरोप फडणवीस यांनी केला. लोकमतच्या सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. 

SurJyotsna Awards 2021: राज्यात काँग्रेसचा उपमुख्यमंत्री होणार का?; अशोक चव्हाणांनी स्पष्टच सांगितलं...संगीत क्षेत्रातील सर्वोत्कृष्टतेचा गौरव करणारा सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार सोहळा आज सायन येथील षण्मुखानंद सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत रंगतोय. या सोहळ्यात ख्यातनाम गायक, संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांचा सूर ज्योत्स्ना सरस्वती पुरस्कार देऊन सन्मान केला जाणार आहे; तसेच उदयोन्मुख गायक-गायिका प्रथमेश लघाटे आणि हरगून कौर यांचा सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. लोकमत सखी मंचच्या संस्थापक आणि संगीतसाधक ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतीनिमित्त लोकमत मीडिया ग्रुपतर्फे सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार दिले जातात.

टॅग्स :sur Jyotsna awardसूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीShiv Senaशिवसेना