मुंबई: बिहारमधील निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात महाराष्ट्राची बदनामी करण्याचा डाव आखला गेल्याचा गंभीर आरोप गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला. केवळ राजकीय पोळी भाजण्यासाठी मुंबई पोलिसांना, महाराष्ट्राला बदनाम करण्याचं षडयंत्र रचण्यात आल्याचा दावा देशमुख यांनी केला. त्यांचा थेट रोख भाजपवर होता. सुशांतच्या शरीरात कोणत्याही प्रकारचं विष आढळून आलं नसल्याचं एम्सच्या अहवालातून समोर आलं आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांचा तपास योग्य दिशेनं सुरू होता यावर शिक्कामोर्तब झालं आहे. मात्र तरीही मुंबई पोलिसांना नाहक बदनाम करण्यात आलं. बिहारमधील विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून एका राष्ट्रीय पक्षानं महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप देशमुख यांनी केला. भाजपचं नाव न घेता त्यांनी हा आरोप केला.
राजकीय पोळी भाजण्यासाठी सुशांत प्रकरणातून महाराष्ट्राची बदनामी; गृहमंत्र्यांचा भाजपवर निशाणा
By कुणाल गवाणकर | Published: September 29, 2020 7:45 PM