सुशीलकुमार शिंदे यांचे काँग्रेसमधील सद्यस्थितीबाबत धक्कादायक विधान, म्हणाले, काँग्रेसमध्ये आता...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2021 04:27 PM2021-07-01T16:27:18+5:302021-07-01T16:30:24+5:30

Sushilkumar Shinde: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांनी पक्षाच्या सद्यस्थितीबाबत मोठे आणि धक्कादायक विधान केले आहे.

Sushilkumar Shinde's shocking statement about the current situation in the Congress, said, now in the Congress ... | सुशीलकुमार शिंदे यांचे काँग्रेसमधील सद्यस्थितीबाबत धक्कादायक विधान, म्हणाले, काँग्रेसमध्ये आता...

सुशीलकुमार शिंदे यांचे काँग्रेसमधील सद्यस्थितीबाबत धक्कादायक विधान, म्हणाले, काँग्रेसमध्ये आता...

googlenewsNext
ठळक मुद्देकाँग्रेसमधील चर्चा आणि संवादाची परंपरा आता संपुष्टात आली आहेपक्षाला याबाबत आत्मचिंतन करण्याची गरज आहे एकवेळ होती जेव्हा पक्षात माझ्या शब्दाला किंमत होती. मात्र आता माझ्या शब्दाला किंमत आहे की नाही हे मला माहिती नाही

नवी दिल्ली - गेल्या काही काळापासून काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात अंतर्गत कुरमुरी वाढत आहेत. अनेक ज्येष्ठ नेते पक्षाची सद्यस्थिती आणि पक्ष नेतृत्वाबाबत उघडपणे आपले मत मांडत आहेत. आता या नेत्यांमध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांच्या नावाची भर पडली आहे. सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी पक्षाच्या सद्यस्थितीबाबत मोठे आणि धक्कादायक विधान केले आहे. काँग्रेसमध्ये आता संवाद आणि चर्चेची परंपरा संपुष्टात आली आहे. पक्ष चुकीच्या धोरणांवरून वाटचाल करत आहे. अशा परिस्थितीत पक्षाला योग्य वाटेवर आणण्यासाठी आत्मचिंतनाची गरज आहे. (Sushilkumar Shinde's shocking statement about the current situation in the Congress)

पुण्यामध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये सुशील कुमार शिंदे म्हणाले की, काँग्रेसमधील चर्चा आणि संवादाची परंपरा आता संपुष्टात आली आहे. मला याचे खूप दु:ख वाटते. पक्षाला याबाबत आत्मचिंतन करण्याची गरज आहे. आमची धोरणे चुकीची असू शकतात. अशा परिस्थितीत त्यांना योग्य मार्गावर आणण्यासाठी अशा सत्रांची गरज आहे. एकवेळ होती जेव्हा पक्षात माझ्या शब्दाला किंमत होती. मात्र आता माझ्या शब्दाला किंमत आहे की नाही हे मला माहिती नाही, अशी खंतही सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केली.

गतवर्षी पक्षातील २३ वरिष्ठ नेत्यांनी पक्षामध्ये मोठे फेरबदल करण्याबाबत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिले होते. या गटाला जी-२३ असे नाव देण्यात आले होते. या गटामध्ये कपिल सिब्बल, शशी थरूर, गुलाम नबी आझाद आणि आनंद शर्मा यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांच्या समावेश होता. पक्षाने आतापर्यंत या नेत्यांची नाराजी दूर केलेली नाही.

दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी या विधानावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, जर सुशील कुमार शिंदे यांनी काही सांगितले असेल तर पक्षाने या मुद्द्यावर चर्चा केली पाहिजे. कारण ते काँग्रेसच्या सर्वात ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी पक्षासाठी मोठे योगदान दिलेले आहे.

दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे स्थिर आहे आणि सत्ताधारी आघाडीला कुठल्याही प्रकारचा धोका नसल्याचे सांगितले. दरम्यान, शिवसेना आणि भाजपा पुन्हा एकदा एकत्र येण्याच्या हालचाली करत असल्याच्या अफवाही राजकीय वर्तुळात पसरल्या आहेत.  
 

Web Title: Sushilkumar Shinde's shocking statement about the current situation in the Congress, said, now in the Congress ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.