कोलकाता:पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुका होऊन दोन महिने उलटून गेले, तरी राजकीय वर्तुळात यासंदर्भातील चर्चा सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. निवडणुकांच्या तोंडावर भाजपमध्ये गेलेले काही नेते पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झाले आहेत. बंगालमधील पराभवानंतर भाजपवर विरोधकांकडून जोरदार टोलेबाजी करण्यात आली. आता मात्र ममता बॅनर्जींविरोधात दंड थोपटून विजयी झालेल्या सुवेंदू अधिकारी यांनीच आता भाजपला घरचा अहेर दिला आहे. काही नेत्यांच्या अती आत्मविश्वासामुळे भाजपचा पश्चिम बंगालमध्ये पराभव झाला, या शब्दांत अधिकारी यांनी पक्षालाच सुनावले आहे. (suvendu adhikari claims bjp lost in west bengal due to overconfident leaders)
सुवेंदू अधिकारी हे भाजपचे विरोधी पक्षनेते आहेत. मात्र, भाजपचा झालेला पराभव सुवेंदू अधिकारी यांच्या जास्तच जिव्हारी लागल्याचे दिसत आहे. काही नेत्यांच्या अती आत्मविश्वासामुळेच पक्षाचा पराभव झाला. अती आत्मविश्वासामुळे मूळ जमिनीवर असणारी परिस्थिती समजून घेता आली नाही, या शब्दांत सुवेंदू अधिकारी यांनी चांदीपूर येथे झालेल्या पक्षाच्या बैठकीत सुनावले.
भाजपशासित राज्यांत फेरबदल? नवीन फळी उभारणार, वरिष्ठ नेतृत्वाची मुख्यमंत्र्यांशी चर्चा
जमिनीवरील परिस्थिती माहिती घेतली नाही
आपले लक्ष्य ठरवत असताना जमिनीवर काम करणेही तितकेच महत्वाचे आहे. ही सत्य परिस्थिती असून, यासाठी कठोर श्रम गरजेचे आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यांध्ये आपण चांगली कामगिरी केली. मात्र, त्यानंतर आपल्या काही नेत्यांना भाजपला १७० ते १८० जागा सहज मिळवेल, असा विश्वास वाटू लागला. पण यावेळी त्यांनी जमिनीवरील परिस्थिती कोणतीही माहिती घेतली नाही. याचा आपल्याला खूप मोठा फटका बसला, असे अधिकारी म्हणाले.
नोकरीची सुवर्ण संधी! TCS, Infosys, Wipro एक लाख कर्मचाऱ्यांची करणार भरती
दरम्यान, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलेल्या कल्याणकारी प्रकल्प आणि विकासाच्या कामांचा सुवेंदू अधिकारी यांना सोयीस्करपणे विसर पडला आहे. भाजप स्वप्नात जगत आहे, कारण त्यांच्या अनेक नेत्यांनी २०० हून अधिक जागा मिळतील असे वाटले होते. ते इतरांमध्ये दोष का शोधत आहेत? सुवेंदू अधिकारी यांनीदेखील १८० जागा मिळतील असे वारंवार म्हटले होते. खरे तर त्यांनी बंगालची मुख्य नाडी माहिती नाही, जी तृणमूल काँग्रेसला माहिती आहे, अशी प्रतिक्रिया कुणाल घोष यांनी दिली.