West Bengal Election :स्वपन दासगुप्तांना तृणमूल काँग्रेसने घेरले; उमेदवारीसाठी राज्यसभा खासदारकीचा दिला राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 02:15 PM2021-03-16T14:15:46+5:302021-03-16T14:16:40+5:30
West Bengal Election 2021: स्वपन दासगुप्ता हे राज्यसभेचे नामांकित सदस्य आहेत. भारतीय संविधानानुसार त्यांच्या प्रतिष्ठेचा हवाला देत तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी यावर आक्षेप घेतला आहे.
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक (West Bengal assembly Election) दिवसेंदिवस रंगतदार आणि तेवढीच घडामोडींची होऊ लागली आहे. केंद्रात सत्ताधारी भाजपा (BJP) आणि राज्यातील सत्ताधारी तृमणूल (TMC) अशा दोन ताकदवान पक्षांमध्ये जोरदार टक्कर पहायला मिळत आहे. यातच भाजपाने नामांकित राज्यसभा खासदाराला उमेदवारी दिल्याने राज्यसभेत आज मोठा गोंधळ उडाला. आमदारकीसाठी पश्चिम बंगालमधील मोठी हस्ती असलेल्या स्वपन दासगुप्ता (Swapan Dasgupta) यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे. (Bjp Candidate Swapan Dasgupta Resigned from Rajyasabha MP for west Bengal Election.)
भाजपाने राज्यसभेचे सदस्य आणि बंगालमधील मोठी हस्ती स्वपन दासगुप्ता यांनी हुगली जिल्ह्यातील तारकेश्वर विधानसभा मतदारसंघातून तिकिट दिले आहे. स्वपन दासगुप्ता हे कोणत्याही पक्षाचे सदस्य नाहीत. ते नामांकित सदस्य आहेत. अशा सदस्यांना कोणत्याही पक्षात प्रवेश करता येत नाही. पश्चिम बंगालमध्ये 6 एप्रिलला होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी रविवारी भाजपाने 26 उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये दासगुप्तांचे नावदेखील होते. यावर तृणमूल काँग्रेसने आज राज्यसभेत आक्षेप घेतला होता.
Swapan Dasgupta is BJP candidate for WB polls.
— Mahua Moitra (@MahuaMoitra) March 15, 2021
10th Schedule of Constitution says nominated RS member to be disqualified if he joins any political party AFTER expiry of 6 months from oath.
He was sworn in April 2016, remains unallied.
Must be disqualified NOW for joining BJP. pic.twitter.com/d3CDc9dNCe
स्वपन दासगुप्ता हे राज्यसभेचे नामांकित सदस्य आहेत. भारतीय संविधानानुसार त्यांच्या प्रतिष्ठेचा हवाला देत तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी यावर आक्षेप घेतला आहे. त्यांनी ट्विट करून पहिल्यांदा यावर आक्षेप घेतला. राज्यघटनेच्या 10 व्या तरतुदीनुसार जर एखादा राज्यसभेचा नामांकित सदस्य शपथ घेतल्यानंतर आणि 6 महिन्यांचा कालावधी संपल्यानंतर जर कोणत्याही राजकीय पक्षात जात असेल तर त्याचे राज्यसभा सदस्यपद अयोग्य घोषित केले जाईल. असे असताना दासगुप्ता यांना एप्रिल 2016 मध्ये शपथ देण्यात आली होती. आता त्यांना भाजपात जाण्यामुळे अयोग्य घोषित केले जायला हवे, असे मोईत्रा यांनी म्हटले. यावरून राज्यसभेत गदारोळ होताच स्वपन दासगुप्ता यांनी राज्यसभेचे सभापती एम. एम. वेंकय्या नायडू यांच्याकडे आपला राजीनामा पाठवून दिला आहे.
दासगुप्ता यांना साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील कामगिरीमुळे 2015 मध्ये पद्म भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. दासगुप्ता यांच्यासह आणखी तीन खासदार भाजपाने पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहेत.