शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

"सोनियाजी मला फोन करुन विचारतात की..."; उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर एकच हशा पिकला

By मोरेश्वर येरम | Published: December 03, 2020 7:12 PM

तीन पक्षाचं सरकार कसं जोमाने काम करतंय हे सांगितलं. हे सांगत असताना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींसोबत फोनवरुन होत असलेल्या चर्चेची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. 

ठळक मुद्दे'महाराष्ट्र थांबला नाही, महाराष्ट्र थांबणार नाही' पुस्तिकेचं प्रकाशनमहाविकास आघाडीच्या वर्षभराच्या कामगिची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचं प्रकाशमहाविकास आघाडी सरकार एकदम भक्कम असल्याचा ठाकरेंचा पुनरुच्चार

मुंबईमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आज 'महाराष्ट्र थांबला नाही, महाराष्ट्र थांबणार नाही' या पुस्तिकेचा प्रकाशन कार्यक्रम झाला. महाविकास आघाडी सरकारने गेल्या वर्षभरात केलेल्या कामाचा लेखाजोखा या पुस्तिकेतून मांडण्यात आला आहे.

उद्धव ठाकरे यांनी या कार्यक्रमात बोलत असताना सरकारमधील सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन केले आणि तीन पक्षाचं सरकार कसं जोमाने काम करतंय हे सांगितलं. हे सांगत असताना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींसोबत फोनवरुन होत असलेल्या चर्चेची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. 

"राज्याचं तीन पक्षांचं सरकार तग धरेल का? असे प्रश्न उपस्थित केले जात होते. पण या तीन पक्षाच्या सरकारला शरद पवारांसारखं अनुभवी मार्गदर्शन लाभलं आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी देखील फोनवरुन काम कसं चाललंय याची विचारपूस करत असतात. आमचे लोक तुम्हाला त्रास तर देत नाहीत ना? असंही त्या विचारात", उद्धव ठाकरेंनी असं म्हटलं आणि उपस्थितांमध्ये हशा पिकला. त्यानंतर लगेचच उद्धव ठाकरेंनी,"मी सोनियाजींकडे तुमची बाजू लावून धरतो. तिथं मी मागे हटत नाही", असं म्हणून राज्यातील काँग्रेस नेत्यांच्या कामाचं सोनिया गांधी यांच्याकडे कौतुक करत असल्याचं सांगितलं.

राज्य सरकारच्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती. 

मी अनुभवी नसलो तरी अनुभवी टीमची साथ"राज्य चालवण्याचा अनुभव माझ्याकडे नाही अशी टीका केली जात होती. पण अनुभवी सहकाऱ्यांची टीमसोबत असल्याने मला कसलीच चिंत वाटली नाही. मुख्यमंत्री घरातून बाहेर पडत नाहीत असं वारंवार विरोधक बोलतात. त्यांना सांगायला हवं की माझ्या सहकाऱ्यांची टीम घरीघरी जाऊन काम करतेय त्यामुळे मला बाहेर पडावं लागत नाही. इतकं भक्कमपणे हे सरकार उभं आहे.", असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

जनतेच्या विश्वासाच्या चौथ्या चाकाची सरकारला जोड"जनतेच्या विश्वासाने हे सरकार चाललं आहे. जनतेचे आशीर्वाद आमच्या सोबत आहेत. तीन चाकी सरकार म्हणून या सरकारची हेटाळणी केली जाते. पण या सरकारचं चौथं चाक हे जनतेच्या विश्वासाचं आहे", असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसMaharashtraमहाराष्ट्र