पाच राज्यांसाठी भाजपची यादी जाहीर; बंगालमधून बाबूल सुप्रियो, तमिळनाडूतून खुशबू, तर केरळमधून श्रीधरन मैदानात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2021 04:57 PM2021-03-14T16:57:47+5:302021-03-14T17:04:54+5:30

Elections 2021 : पाच राज्यांच्या निवडणुकांसाठी भाजपनं जारी केली उमेदवारांची यादी, केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियो पश्चिम बंगालमधून निवडणूक लढवणार

tamil nadu assembly elections bjp announce remaining candidate list bengal assam tamil nadu kerala puducherry assembly elections 2021 | पाच राज्यांसाठी भाजपची यादी जाहीर; बंगालमधून बाबूल सुप्रियो, तमिळनाडूतून खुशबू, तर केरळमधून श्रीधरन मैदानात

पाच राज्यांसाठी भाजपची यादी जाहीर; बंगालमधून बाबूल सुप्रियो, तमिळनाडूतून खुशबू, तर केरळमधून श्रीधरन मैदानात

Next
ठळक मुद्देपाच राज्यांच्या निवडणुकांसाठी भाजपनं जारी केली यादीकेंद्रीय मंत्री बाबूल सुप्रिया पश्चिम बंगालमधू निवडणूक लढवणार

भारतीय जनता पक्षानं पाच राज्यांच्या निवडणुकांसाठी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. आज पश्चिम बंगालमध्ये निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली. भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरूण सिंह यांनी केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियो हे विधानसभा निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली. बाबुल सुप्रियो यांनी टॉलिगंज येथून उमेदवारी देण्यात आली आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकांमध्ये भाजपनं चार खासदारांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे. 

तर दुसरीकडे अभिनेते यशदासगुप्ता यांना चंडीतला येथून उमेदवारी देण्यात आली आहे. तर खासदार लॉकेट चटर्जी या चुरचुरा येथून निवडणूक लढवतील. अंजना बासू सोनपूरा दक्षिण, तर राजीव बॅनर्जी डोमजूर येथून, पायल सरकार बेहाला पूर्व आणि अलीपूरद्वार येथून अशोक लाहिरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 



पश्चिम बंगालच्या निवडणुकांसाठी रविवारी भाजपकडून ६५ नावांची घोषणा करण्यात आली. यातूल २७ उमेदवारी तिसऱ्या टप्प्यासाठी आहे. तर ३८ उमेदवार हे चौथ्या टप्प्यातील आहे. यामध्ये रविद्रनाथ भट्टाचार्य यांचं नावदेखील सामील आहे. त्यांना सिंहपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. तर स्वप्नदास गुप्ता यांना तारकेश्वर. निशित परमानिक यांना दीनहाटा, इंद्रनील दास यांना कासबा आणि अभिनेत्री तनुश्री चक्रवर्ती यांना हावडा श्यामपूरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 



तामिळनाडूत २० जागांवर निवडणूक लढवणार

दरम्यान तामिळनाडूच्याही उमेदवारांची घोषणा यावेय़ळी करण्यात आली. तामिळनाडूत भाजप एनडीएचे सहकारी म्हणून निवडणूक लढवणार असल्याचं सिंह यांनी सांगितलं. आम्ही राज्यातील २० विधानसभा क्षेत्रांमध्ये निवडणूक लढवणार आहे. प्रदेशाध्यक्ष एल. मुरूगन हे धारापुरम मधून निवडणूक लढवणार आहेत. तर ज्येष्ठ नेते एच राजा कराईकुडी येथून निवडणूक लढवतील. आज भाजपनं १७ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे.





केरळमध्ये भाजप ११५ जागा लढवणार

केरळमध्ये भाजप ११५ जागांवर निवडणूक लढवणाक आहे. तर अन्य २५ जागा या ४ पक्षांसाठी सोडण्यात आल्या आहेत. मेट्रो मॅन ई श्रीधरन हे पलक्कडमधून निवडणूक लढवणार आहेत. तर माजी राज्य भाजप प्रमुख कुम्मनम राजशेखरन हे नेमोम येथून निवडणूक लढवतील. याव्यतिरिक्त भाजपकडून आसाम आणि पडुचेरीमधील उमेदवरांच्या नावांचीही घोषणा करण्यात आली.

Web Title: tamil nadu assembly elections bjp announce remaining candidate list bengal assam tamil nadu kerala puducherry assembly elections 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.