भारतीय जनता पक्षानं पाच राज्यांच्या निवडणुकांसाठी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. आज पश्चिम बंगालमध्ये निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली. भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरूण सिंह यांनी केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियो हे विधानसभा निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली. बाबुल सुप्रियो यांनी टॉलिगंज येथून उमेदवारी देण्यात आली आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकांमध्ये भाजपनं चार खासदारांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे. तर दुसरीकडे अभिनेते यशदासगुप्ता यांना चंडीतला येथून उमेदवारी देण्यात आली आहे. तर खासदार लॉकेट चटर्जी या चुरचुरा येथून निवडणूक लढवतील. अंजना बासू सोनपूरा दक्षिण, तर राजीव बॅनर्जी डोमजूर येथून, पायल सरकार बेहाला पूर्व आणि अलीपूरद्वार येथून अशोक लाहिरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
पाच राज्यांसाठी भाजपची यादी जाहीर; बंगालमधून बाबूल सुप्रियो, तमिळनाडूतून खुशबू, तर केरळमधून श्रीधरन मैदानात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2021 17:04 IST
Elections 2021 : पाच राज्यांच्या निवडणुकांसाठी भाजपनं जारी केली उमेदवारांची यादी, केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियो पश्चिम बंगालमधून निवडणूक लढवणार
पाच राज्यांसाठी भाजपची यादी जाहीर; बंगालमधून बाबूल सुप्रियो, तमिळनाडूतून खुशबू, तर केरळमधून श्रीधरन मैदानात
ठळक मुद्देपाच राज्यांच्या निवडणुकांसाठी भाजपनं जारी केली यादीकेंद्रीय मंत्री बाबूल सुप्रिया पश्चिम बंगालमधू निवडणूक लढवणार