कठीण आहे राव; भाजपच्या जाहिरातीत चिदंबरम यांच्या सूनबाईंचा फोटो झळकतो तेव्हा...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 11:14 AM2021-03-31T11:14:02+5:302021-03-31T11:15:11+5:30
भाजपनं प्रचारासाठी जो व्हिडीओ पोस्ट केला त्यात असलेली महिला कलाकार ही काँग्रेसचे खासदार कार्ति चिदंबरम यांच्या पत्नी श्रीनिधी चिदंबरम होत्या.
तामिळानाडूमध्ये आपलं अस्थित्व वाढवण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे मोठे प्रयत्न सुरू आहेत. परंतु प्रचाराच्या ठिकाणी मात्र त्यांची मोठी गफलत झाली आहे. भाजपच्या तामिळनाजू युनिटनं एक व्हिडीओ पोस्ट केला होता. हा व्हिडीओ त्यांच्या प्रचाराचाच एक भाग होता. परंतु त्यामध्ये एका महिला कलाकाराला दाखवण्यात आलं होतं ती कलाकार काँग्रेसचे खासदार कार्ति चिदंबरम यांची पत्नी श्रीनिधी चिंदबर होती. याची माहिती मिळाल्यानंतर भाजपनं त्वरित आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ हटवला.
माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांच्या सुपुत्र कार्ति चिदंबरम यांच्या पत्नी श्रीनिधी चिदंबरम या एक कलाकार आहेत. तसंच त्या एक मेडिकल प्रोफेशनलही आहेत. भाजपनं आपलं व्हिजन आणि जाहीरनामा समोर ठेवण्यासाठी एक कॅम्पेन व्हिडीओ जारी केला होता. यामध्ये तामिळनाडूच्या संस्कृतीचा उल्लेख करण्यात आला. यामध्ये कार्ति चिदंबरम यांच्या पत्नी श्रीनिधी चिदंबरम यांचा भरतनाट्यम हा नृत्य प्रकार करतानाचाही एक व्हिडीओ होता.
इतकंच नाही तर हा भाग ज्या गाण्यात वापरण्यात आला होता ते गाणंही डीएमकेचे प्रमुख असलेले आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री करूणानिधी यांनी लिहिलं होतं. अशातच हा कॅम्पेन व्हिडीओ भाजपच्या समस्या वाढवणारा ठरला. सोशल मीडियावर भाजपच्या या कॅम्पेन व्हिडीओला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं. त्यानंतर भाजपनं हा व्हिडीओ हटवला.
Dear @BJP4TamilNadu, we understand 'consent' is a difficult concept for you to understand, but you cannot use Mrs Srinidhi Karti Chidambaram's image without her permission. All you've done is prove that your campaign is full of lies & propaganda. pic.twitter.com/CTYSK9S9Qw
— Tamil Nadu Congress Committee (@INCTamilNadu) March 30, 2021
काँग्रेसकडूनही ट्वीट
काँग्रेसचे खासदार कार्ति चिदंबरम यांनी ट्विटरवर याची माहिती दिली. तर दुसरीकजे काँग्रेसनं ट्वीट करत भाजपवर निशाणा साधला. भाजपनं श्रीनिधी चिदंबरम यांचा फोटो त्यांच्या परवानगीशिवाय वापरला. कॅम्पेन व्हिडीओमध्ये सिद्ध झालं की भाजपकडे स्वत:चं असं कोणतंबी व्हिजन नाही, असं काँग्रेसनं म्हटलं. तामिळनाडूमध्ये ६ एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे.