Who is Basavaraj S Bommai: कर्नाटकमध्येमुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना आज फुलस्टॉप लागला आहे. बीएस येडीयुराप्पांनी राजीनामा दिल्याने नवा मुख्यमंत्री कोण होणार, याची चर्चाही आता संपली आहे. बसवराज बोम्मई (Basavaraj S Bommai) कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री झाले आहेत. कोण आहेत हे बसवराज बोम्मई, लिंगायत समाजावर त्यांचा कितपत प्रभाव आहे, चला जाणून घेऊया. (Karnataka CM Basavaraj S Bommai started his career in TaTa Group as a mechanical engineer.)
Karnataka CM: कर्नाटकात गृहमंत्र्यांना मिळाली बढती; बसवराज बोम्मई नवे मुख्यमंत्री
येडीयुराप्पा जेव्हा दिल्लीला गेलेले तेव्हाच बसवराज बोम्मई यांचे नाव त्यांनी दिल्लीश्वरांना सुचविले होते. येडीयुराप्पांच्या मंत्रीमंडळात देखील बोम्मईंना दुसऱे स्थान होते. 2008 मध्ये भाजपात आलेल्या बोम्मईंनी 13 वर्षांत मोठी प्रगती करत मुख्यमंत्री पद गाठले आहे. बोम्मई यांना मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे.
बसवराज बोम्मई (Basavaraj S Bommai) यांचा जन्म 28 जानेवारी 1960 मध्ये झाला. बोम्मई हे भाजपाचे नाहीत तर जनता दलाचे. त्यांचे वडील एसआर बोम्मई कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. जनता दलातून बसवराज यांनी राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. बोम्मई हे लिंगायत समाजाचे नेते आहेत. ते काही काळातच येडीयुराप्पांचे खास बनले. बसवराज बोम्मई यांनी 2008 मध्ये भाजपात प्रवेश केला. तेव्हापासून त्याना मागे वळून पहावे लागले नाही. येडीयुराप्पांच्या काळात ते मंत्री होते. (Basavaraj S Bommai political career)
बोम्मई हे मॅकेनिकल इंजिनिअर आहेत. त्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात टाटा समुहातून (Tata Group) केली होती. दोन वेळा विधान परिषदेवर आणि तीन वेळा आमदार म्हणून ते निवडून गेले आहेत. भाजपात जाण्याआधी त्यांनी एचडी देवेगौडा आणि रामकृष्ण हेगडेंसोबत काम केले आहे. 1998 आणि 2004 मध्ये ते धारवाडमधून विधानपरिषदेचे आमदार होते. जनता दल युनायटेड सोडल्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला होता.