रत्नागिरी: विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी नव्हे, तर कोकणवासीयांना दिलासा देण्यासाठी चक्रीवादळग्रस्त भागाचा दौरा करत असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री केवळ चार तासांसाठी कोकणचा दौरा करत आहेत, अशी टीका भारतीय जनता पक्षाकडून केली जात आहे. त्यावर चार तासांसाठी आलो आहे. फोटोसेशन करायला आलो नाही. मला त्याची गरज वाटत नाही, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. ते रत्नागिरीत आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधत होते. हे फडणवीसांना तर पटेल काय? मोदींना कानपिचक्या, देवेंद्रांचे कान टोचलेमुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर आहेत. तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसलेल्या भागांचा आढावा मुख्यमंत्री घेणार आहेत. मात्र चार तासांच्या दौऱ्यातून परिस्थितीचं आणि संकटाचं गांभीर्य कसं कळणार, असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे. त्यावर हेलिकॉप्टरनं पाहणी करत नाही. प्रत्यक्ष जमिनीवर उतरून आढावा घेत आहे, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींना टोला लगावला. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातमधील वादळग्रस्त भागाची हवाई पाहणी केली. त्यावरून मुख्यमंत्र्यांनी चिमटा काढला.
हेलिकॉप्टरमधून पाहणी करत नाही; प्रत्यक्ष जमिनीवर उतरलोय; मुख्यमंत्र्यांचा मोदींना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 10:05 AM