शहरं
Join us  
Trending Stories
1
“जो शब्द दिला तो पाळतात, अजित पवार मर्द माणूस”; नवाब मलिकांनी केले तोंडभरून कौतुक
2
"145 उमेदवार उभे केले म्हणजे..."; रामदास आठवलेंचा राज ठाकरेंना खोचक टोला
3
"ते खटा-खट म्हणत राहिले, आम्ही महिलांच्या खात्यात पटापट पैसे टाकले"; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना टोला
4
बंद पडलेल्या जेट एअरवेजची मालमत्ता विकण्याचे आदेश; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
5
सदाभाऊंची जीभ पुन्हा घसरली; संजय राऊतांना म्हणाले, "कितीही साबण, शाम्पू लावला तरी..."
6
यासीन मलिकच्या पत्नीचं राहुल गांधींना पत्र; "जम्मू काश्मीरातील शांततेसाठी..."
7
इगतपुरी - त्र्यंबकेश्वर मतदारसंघ : चौरंगी लढतीत कोण निवडून येणार राव?
8
सरकारी भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत,सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
9
१२ बेरोजगार तरुणांच्या खात्यात अचानक १२५ कोटींची उलाढाल, नाशिकमध्ये काय घडलं?
10
नवरा बायकोचं भांडण, एका 'OK' नं रेल्वेला ३ कोटींचा फटका; कोर्टातील अजब प्रकरण काय?
11
"जे मविआच्या उमेदवारांविरोधात उभे, त्यांना..."; काँग्रेसने बंडखोरांबद्दल घेतला निर्णय
12
Shah Rukh Khan :"जीव वाचवायचा असेल तर कोट्यवधी रुपये द्या, अन्यथा..."; सलमाननंतर शाहरुख खानला धमकी
13
"मला धमकावलं जातंय...", साक्षी मलिकचं PM मोदींना कुस्ती वाचवण्याचं आवाहन
14
Girnar Parikrama 2024: 'या' पाच दिवसांतच गिरनारच्या जंगलात मिळतो प्रवेश; जेवढ्या यातना तेवढाच आनंद!
15
शरद पवारांवरील टीका 'मानसपुत्रा'च्या जिव्हारी; निषेध व्यक्त करत वळसे पाटलांनी खोतांना दिला इशारा
16
सदाभाऊंना कुत्रा म्हणणाऱ्या संजय राऊतांना नितेश राणेंनी दिली अशी उपमा, म्हणाले... 
17
विरोध डावलून नवाब मलिकांना उमेदवारी दिली, आता प्रचारही करणार का? अजित पवारांचे सूचक विधान
18
धनंजय मुंडे यांच्या संगनमताने करोडोची जमीन अल्प किंमतीत विकून फसविले: सारंगी महाजन
19
Maharashtra Election 2024: देवेंद्र फडणवीस, बावनकुळेंसह दिग्गजांची परीक्षा! काँग्रेसचे आव्हान कसे पेलणार?
20
सदाभाऊ खोतांच्या विधानावर संजय राऊतांचा संताप; देवेंद्र फडणवीसांवर टीका करत म्हणाले...

"ठाकूर यांनी ठाकरेंना हाणले, आकडेवारीनिशी आपल्याच सरकारचे वाभाडे काढले’’

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2021 12:44 PM

Coronavirus in Maharashtra : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रकोपामुळे राज्यात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्याठी राज्य सरकारकडून कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत.

मुंबई - कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रकोपामुळे राज्यात (Coronavirus in Maharashtra) चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्याठी राज्य सरकारकडून कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत. दरम्यान, या कठोर निर्बंधावरून विरोधी पक्ष आणि व्यापारी आवाज उठवत आहेत. दरम्यान, अमरावतीमध्ये (Amravati) कोरोनाला रोखण्यासाठी लावण्यात आलेले निर्बंध शिथिल करण्यासाठी राज्य सरकारमधील मंत्री यशोमती ठाकूर यांनी पत्र लिहिले आहे. दरम्यान, या पत्राचा आधार घेत भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. ( Atul Bhatkhalkar Says, "Thakur Criticize Thackeray, rents out his own government with statistics")अतुल भातखळकर यांनी यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये ते म्हणतात. ठाकूर यांनी ठाकरेंना हाणले. ठाकरे मंत्रिमंडळातील मंत्री यशोमती ठाकूर यांनी आकडेवारीनिशी आपल्याच सरकारचे वाभाडे काढले आहेत. कोणताही अभ्यास न करता सरसकट लॉकडाऊन कसा अन्यायाने लादला आहे, हे दर्शविणारे  यशोमती ठाकूर यांचे पत्र म्हणजे ठाकरे सरकारला घरातून मिळालेली सणसणीत चपराक आहे, असा टोला भातखळकर यांनी लगावला आहे.

यशोमती ठाकूर यांनी लॉकडाऊन शिथिल करण्यासाठी लिहिलेल्या पत्रात जिल्ह्यातील गेल्या दोन महिन्यातील कोरोना रुग्णांची आणि पॉझिटिव्हिटी रेटची आकडेवारी दिली आहे. सुरुवातीच्या काळात मोठ्या प्रमाणात होत असलेली रुग्णवाढ आता नियंत्रणात आली आहे. त्यामुळे आता कोरोनाला रोखण्यासाठी लागू करण्यात आलेले निर्बंध आता शिथिल करावेत, असे यशोमती ठाकूर यांनी म्हटले आहे. त्याचाच आधार घेत भाजपाने ठाकरे सरकारवर टीका केली आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसUddhav Thackerayउद्धव ठाकरेYashomati Thakurयशोमती ठाकूरAtul Bhatkalkarअतुल भातखळकरAmravatiअमरावती