Maharashtra Assembly election 2024 mahayuti conflict: छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी नांदगाव मनमाड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा देत समीर भुजबळांनी बंडखोरी केली आहे. त्यांच्या बंडखोरीनंतर नांदगावचे शिवसेनेचे विद्यमान आमदार सुहास कांदे यांनी आक्रमक भूमिका घेत थेट छगन भुजबळ यांच्या येवला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची भूमिका मांडली आहे. त्यामुळे नाशिकमध्ये महायुतीतील संघर्ष वाढण्याची चिन्हं दिसत आहे.
समीर भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेऊन नांदगाव मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर सुहास कांदे यांनी पत्रकार परिषद घेऊन छगन भुजबळ, समीर भुजबळ यांच्यावर भ्रष्टाचार प्रकरणावर बोट ठेवत गंभीर आरोप केले.
"छगन भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन"
समीर भुजबळ म्हणाले, "मी आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना विचारणार आहे. मला येवल्यातून लढण्याची फार इच्छा आहे. त्यांनी जर मला परवानगी दिली, तर मी येवल्यातून छगन भुजबळ यांच्याविरोधात निवडणूक लढवेन."
शिंदे-फडणवीस, जरांगेंची भेट घेतली -सुहास कांदे
"मी मनोज जरांगे पाटलांना भेटलो. मी देवेंद्र फडणवीसांनाही भेटलो. मी एकनाथ शिंदे यांनाही भेटलो आहे. मी आता त्यांच्या पूर्व परवानगी घेणार आहे. त्यांनी परवानगी दिली, तर माझ्या कुटुंबातील एखादा सदस्य इथून (नांदगाव विधानसभा) निवडणूक लढवेन आणि येवल्यातून भुजबळांविरोधात लढेन. विकास काय असतो, हे मी येवलेकरांना दाखवेन. माझी पुढची रणनीती ही येवल्यातून निवडणूक लढण्याची असेल", असे म्हणत सुहास कांदे यांनी छगन भुजबळांना ललकारले आहे.
तिघांनी पद आणि आमदारकीचा राजीनामा द्यावा
सुहास कांदे म्हणाले, "एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मला असं सांगितलं की, आपल्याकडे कुणीही अपक्ष लढणार नाही. त्यांना तसं करायचं असेल, तर छगन भुजबळ, पंकज भुजबळ आणि समीर भुजबळ या तिघांनी पदाचा आणि आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि बिनधास्त निवडणूक लढवावी, असे त्यांनी मला सांगितलं आहे", अशी माहिती कांदे यांनी दिली.