मुंबई - राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपालांनी केलेल्या अभिभाषणावर चर्चा करताना विरोधकांनी केलेल्या आरोपांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज खरपूस समाचार घेतला. यावेळी उद्धव ठाकरेंनी भाषणाच्या सुरुवातीलाच भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांना टोला लगावला. (CM Uddhav Thackeray in Vidhan Sabha) सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) जेव्हा भाषण करतात, तेव्हा मी नटसम्राट बघतोय की काय असा भास होतो. कुणी किंमत देता का किंमत, असा त्यांचा अभिनिवेश असतो, असा चिमटा उद्धव ठाकरे यांनी काढला. (Then it seemed that Natsamrat was watching, Uddhav Thackeray criticize BJP leader Sudhir Mungantiwar)राज्यपालांनी केलेल्या अभिभाषणाच्या अभिनंदन प्रस्तावावर बोलताना उद्धव ठाकरेंनी सरकारविरोधात आक्रमक झालेल्या सुधीर मुनगंटीवार यांचा समाचार घेतला ते म्हणाले की, राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा सुरू असताना काही वेळ मी केबिनमध्ये गेलो होते. तिथून कामकाग पाहत असताना सुधीर मुनगंटीवार बोलत होते. मुनगंटीवार बोलत असताना मी नटसम्राट बघतोय असा भास झाला. मात्र त्यांच्या भाषणाचा शेवट केविलवाणा वाटला. कुणी किंमत देता का किंमत... सुधीरजी, काय तुमचा आवेश... चंद्रकांतदादा आणि देवेंद्रना भीती वाटायला लागली, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
बाकी तुमचंही माझ्यासारखं झालंय. तुमच्यातील कलागुणांना वाव मिळत नाही. मी फोटोग्राफर आहे. गडकिल्ल्यांचे फोटो काढले आहेत. पण सध्या ते करता येत नाही. कलाकार हा कधी लपून राहत नाही. तुम्हीही तुमच्यातला कलाकार मारू नका, असा चिमटाही उद्धव ठाकरेंनी काढला.