शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

"...तर कार्यालय पेटून देऊ", वीज वितरण कंपनीला मनसेने दिला दम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 5:32 PM

MNS Warn power distribution company in Kalyan : वीज पुरवठा खंडीत कारवाईच्या विरोधात मनसेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आज कल्याण टाटा नाका येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात धाव घेऊन अधिका-यांच्या केबीनमधील वीज गुल केली.

कल्याण -वा ढीव वीज बिले पाठवून ती भरली गेली नसल्याने वीज वितरण कंपनीकडून वीज पुरवठा खंडीत करण्याची कारवाई सुरु आहे. या कारवाईच्या विरोधात मनसेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आज कल्याण टाटा नाका येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात धाव घेऊन अधिका-यांच्या केबीनमधील वीज गुल केली. त्यांना मेणबत्ती भेट दिली. वीज पुरवठा खंडीत करण्याची कारवाई थांबविली नाही तर यापूढे कार्यालय पेटून दिले जाईल असा सज्जड इशारा दिला आहे.वीज वितरण कंपनीकडून लॉकडाऊनच्या काळात वाढीव वीज बिले पाठविण्यात आाली होती. लॉकडाऊनमध्ये लोक घरी होते. त्यांच्या हाताला काम नव्हते. तसेच काहींची पगार कपात करण्यात आली होती. आर्थिक संकटात सापडेल्या नागरीकाला दिलासा देण्याऐवजी वीज वितरण कंपनीने वाढीव वीज बिलाचा शॉक दिला. वाढीव वीज बिलाच्या विरोधात मनसे, शिवसेना आणि भाजपने वेळोवेळी आंदोलने केली. दरम्यान अर्थ संकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी वाढीव वीज बिल प्रकरणी वीज पुरवठा खंडीत करण्यात येणार नाही असे आश्वासन दिले होते. वीज वितरण कंपनीकडून वाढीव बील भरावे लागेल यासाठी वीज ग्राहकांना सक्ती केली जात आहे. वीज बिल न भरलेल्या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत केला जात आहे.  

उन्हाळा वाढला आहे. उन्हाने काहिली होत असताना वीज पुरवठा खंडीत केल्यावर घरातील विद्यार्थी ऑनलाईन अभ्यास कसा करणार, घरातील लहान मुले, वृद्ध कसे काय तोंड देणार अशा विविध समस्या आहे. ही परिस्थिती लक्षात घेता मनसेचे पदाधिरी योगेश गव्हाणो, अनंता गायकवाड, निर्मल निगडे, महेंद्र कुंदे यांनी टाटा नाका येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात धाव घेतली. त्याठिकाणी अधिका:यांच्या केबीनमधील  बत्ती कार्यकत्र्यानी गुल केली. विना पंखा, लाईट काम कसे करता, घामाच्या धारा कशा निघतात याची प्रचिती यावेळी अधिकारी वर्गास मनसेने करुन दिली. जवळपास पाऊण तास मनसेचे पदाधिकारी केबीनमध्ये चर्चा करीत होते. यावेळी अधिकाऱ्यांना मेणबत्ती भेट दिली. आत्ता मेणबत्ती भेट दिली आहे. वीज पुरवठा खंडीत करण्याची कारवाई थांबविली नाही तर कार्यालय पेटून देऊ असा दम भरला आहे.

टॅग्स :electricityवीजMNSमनसेPoliticsराजकारण