शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
3
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
4
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
5
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
6
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
7
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
8
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
9
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
10
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
11
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
12
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
13
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
14
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
15
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
16
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
17
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
18
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."
19
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
20
भारतात ईव्हीएम हवे की, बंद व्हावे? बघा सर्व्हे काय सांगतो?

"...तर पुन्हा दिल्लीत घुसावे लागेल, बॅरिकेट्स तोडावे लागतील’’, राकेश टिकैत यांची आंदोलकांना चिथावणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 7:29 PM

Farmers Protest : शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी शेतकऱ्यांना पुन्हा एकदा चिथावणीखोर आवाहन केले आहे. पुन्हा दिल्लीत घुसावे लागेल. पुन्हा बॅरिकेड्स तोडावे लागतील, असे राकेश टिकेत यांनी म्हटले आहे.

ठळक मुद्देकेंद्र सरकार लोकांमध्ये जातीधर्माच्या आधारावर फूट पाडत आहेत. मात्र आता अन्नदाता फुटणार नाहीगरज पडल्यास शेतकरी संसदेमध्ये येऊन आपले धान्य विकून दाखवेलशेतकऱ्यांना जेव्हा दिल्लीच्या दिशेने कूच करण्यास सांगितले जाईल तेव्हा त्यांनी दिल्लीच्या दिशेने कूच करावी. दिल्लीचे बॅरिकेड्स पुन्हा तोडावे लागतील

नवी दिल्ली - केंद्र सरकारने पारीत केलेल्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आता शंभर-सव्वाशे दिवस उलटून गेले आहेत. (Farmers Protest) मात्र कृषी कायद्यांवर दोन्ही पक्षांमध्ये समाधानकारक तोडगा निघू शकलेला नाही. याचदरम्यान, शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी शेतकऱ्यांना पुन्हा एकदा चिथावणीखोर आवाहन केले आहे. पुन्हा दिल्लीत घुसावे लागेल. पुन्हा बॅरिकेड्स तोडावे लागतील, असे राकेश टिकेत यांनी म्हटले आहे. राकेश टिकैत सध्या कृषी कायद्यांविरोधात जनजागृतीसाठी देशातील विविध राज्यांमध्ये किसान महापंचायतींचे आयोजन करत आहेत.  ("... then we will have to re-enter Delhi, barricades will have to be broken", Rakesh Tikait provokes the protesters)

मंगळवारी जयपूरमध्ये किसान महापंचायतीमध्ये राकेश टिकैत यांनी केंद्र सरकारवर जोरदा निशाणा साधला. ते म्हणाले की, केंद्र सरकार लोकांमध्ये जातीधर्माच्या आधारावर फूट पाडत आहेत. मात्र आता अन्नदाता फुटणार नाही. तसेच गरज पडल्यास तो संसदेमध्ये येऊन आपले धान्य विकून दाखवेल. आता शेतकऱ्यांना जेव्हा दिल्लीच्या दिशेने कूच करण्यास सांगितले जाईल तेव्हा त्यांनी दिल्लीच्या दिशेने कूच करावी. दिल्लीचे बॅरिकेड्स पुन्हा तोडावे लागतील, असे आवाहन टिकैत यांनी केले.  

कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाबाबत इशारा करताना राकेश टिकैत म्हणाले की, संपूर्ण देशभरात आंदोलन सुरू झाले आहे. शेतकऱ्यांना आता जागे व्वाहे लागेल. विशेषकरून तरुणांनी आता पुढाकार घेऊन लढले पाहिजे. या देशात जय श्री राम आणि जय भीमच्या घोषणा एकत्र दिल्या जातील, तेव्हा देश वाचेल, असेही त्यांनी सांगितले.  

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनrakesh tikaitराकेश टिकैतPoliticsराजकारण