- संतोष ठाकूर
विजयवाडा-विशाखापट्टणम : लोकसभा निवडणुकीचा ज्वर चढत असतानाच, पुन्हा एकदा केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार बनविण्यासाठी भाजप दिवसरात्र एक करत आहे. संघटन कौशल्यासाठी प्रसिद्ध असलेले भाजपाध्यक्ष अमित शाह प्रचारासाठी झटत आहेत. व्यग्र प्रवासात थोडीसी झोप घेत, ते पुन्हा पहाटेपासून रात्रीपर्यंत कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी, रॅली, रोड शो करीत आहेत. या गडबडीतच त्यांनी ‘लोकमत’ समूहाला मुलाखत दिली. भाषिक व हिंदी वृत्तपत्राला धामधुमीदरम्यान दिलेली ही पहिली मुलाखत. दिल्ली ते विजयवाडा आणि विशाखापट्टणम दरम्यान त्यांनी प्रत्येक प्रश्नाचे न कंटाळता उत्तर दिले.भाजपला किती जागा मिळतील, असं तुम्हाला वाटतं?निवडणूक ज्या स्थितीत आहे, त्यावरून असा अंदाज करणे योग्य नाही, परंतु देशातील वातावरण पाहता भाजपला बहुमत मिळेल. निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच मी संपूर्ण देशाचा दौरा केला आहे. जनता नरेंद्र मोदींना निवडून देण्यास उत्सुक आहे.
भाजपला जागा मिळणार कोठून?,यूपी, बिहार, महाराष्ट्र या राज्यांतभाजपचे नुकसान होईल, असाअंदाज आहे.महाराष्ट्रात शिवसेनेशी युतीनंतर आमची स्थिती चांगली आहे. बिहारमध्ये नीतिश कुमारांशी युती झाल्याने स्थिती मजबूत आहे. यूपीमध्ये सपा-बसपाविरोधात भाजप ५0 टक्के लढाई जिंकण्यासाठी तयार आहे. आम्ही २0१४ आणि २0१७ साली झालेल्या निवडणुकांमध्ये ४0 टक्क्यांपेक्षा जादा मते घेतली आहेत. जेव्हा दोन पक्ष एक होतात, तेव्हा वोटबँक एकत्र होते वा एका पक्षाची मते दुसऱ्याला मिळतातच, असे नाही. आताची मोदी लाट पाहता, तिन्ही राज्यांत आम्ही मोठे यश मिळवू. ओरिसा, बंगाल व ईशान्येची तीन अशी राज्ये आहेत की, जेथे भाजपची स्थिती चांगलीच आहे. केरळ, कर्नाटक, आंध्र व तेलंगणामध्ये स्थिती पूर्वीपेक्षाही चांगली होईल.
महाराष्ट्रात शिवसेनेशी संघर्ष होता. त्यामुळेच किरीट सोमय्यांचे तिकीट कापावे लागले?सोमय्यांच्या तिकिटाशी शिवसेनेचा संबंध नाही. तो भाजपचा निर्णय आहे. शिवसेनेशी मतभेद असते, तर माझ्या अर्ज भरण्यासाठी उद्धव ठाकरे का आले असते?
केंद्रात मोदी व महाराष्ट्रात शिवसेना यासाठी युती झाली, असे शिवसेना म्हणते? विधानसभानिवडणुकीनंतर मुख्यमंत्री सेनेचा असेल का? विधानसभेसाठी दोघांत ५0-५0 टक्के जागावाटप होणार का?
युतीच्या सर्व अटी आम्ही पत्रकार परिषदेत जाहीर केल्या आहेत. आता काही गोंधळ असेल, असे वाटत नाही.
फडणवीसच मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील?सध्या मोदीच आमचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत. शिवसेनेशी मतभेद नाहीत, मात्र मुख्यमंत्रीपदाचा विषय सध्या अजेंड्यावर नाही.
मोदी यांच्या वर्धा रॅलीला गर्दी कमी होती?असे नाही. लोकांचा उत्साह प्रचंड आहे. आम्ही एकेका जागेसाठी रॅली करत आहोत. दोन्ही रॅलीमध्ये फरक असतो. निवडणुकीपूर्वी रॅली झाली आणि तुम्ही म्हणता ती स्थानिक सभा होती.
आपण ७५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तीला तिकीट न देण्याचा निर्णय घेतला आहे. अडवाणी युग संपले..?कोणाचेही युग संपलेले नाही. अडवाणीजी वरिष्ठ नेते आहेत. पक्षाने निर्णय घेतला आहे की, ७५ वर्षांपेक्षा अधिक वयाचे नेते पक्षासाठी निवडणुकीत संघटक म्हणून योगदान देतील.
अडवाणी राज्यसभेत दिसतील?पुढे काय होईल, याचा निर्णय पक्षाचे पार्लमेंटरी बोर्ड घेईल.
प्रियांका फॅक्टर किती आहे?प्रियांका वाड्रा १२ वर्षांपासून राजकारणात आहेत. प्रत्येक वेळी प्रचार करतात व निवडणूक हरतात.
सबका साथ, सबका विकास आणिअच्छे दिनऐवजी हिंदुत्वाची घोषणाका? राहुल व प्रियांका यांच्या मंदिरजाण्याचा हा प्रभाव की हिंदुत्वावरचनिवडणूक जिंकू शकतो, असेभाजपला वाटते?सबका साथ, सबका विकास आणि सांस्कृतिक राष्ट्रवाद, ज्याला तुम्ही सॉफ्ट हिंदुत्व म्हणता, दोन्ही एकच आहे. प्रत्येक नागरिकाचे जीवन सुधारण्याचा आमचा प्रयत्न आहे. सहा कोटी लोकांना गॅस सिलेंडर दिले, आठ कोटी लोकांसाठी शौचालये उभारली, अडीच कोटी लोकांना घरे दिली, २.३५ कोटी लोकांना वीज दिली, १४ कोटी लांकांना मुद्रा बँकेकडून कर्ज दिले, ५0 कोटी लोकांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ दिला. काँग्रेस जाहीरनाम्यात अफप्सा रद्द करण्याचा अजेंडा आणते तर ओमर अब्दुल्ला म्हणतात, की काश्मीरमध्ये दुसरे पंतप्रधान होतील असे म्हणतात. देशाच्या संरक्षणासाठी लष्करासाठी जोपर्यंत गरज आहे, तोपर्यंत अफप्सा कायम राहील.
जम्मू-काश्मीरच्या ३५ ए बाबतआपले काय म्हणणे आहे?कलम ३७0 आणि ३५ ए जनसंघापासून आमच्याअजेंड्यावर होते व यावेळीही राहील.
गेल्या वेळी गोहत्येबाबातदिलल्या कायद्याच्या आश्वासनाचेकाय झाले?भाजपच्या अजेंड्यावर गोहत्यासंदर्भात कायदा कधीच नव्हता. जेथे जेथे आमचे सरकार आहेत, त्यापैकी ईशान्येच्या राज्यांशिवाय सर्वत्र गोहत्येवर बंदी आहे.
राम मंदिराचे काय झाले?तो सर्वोच्च न्यायालयाच्या विचाराधीन आहे. भाजपला त्याच जागेवर लवकर भव्य राम मंदिर हवे आहे. हा आमचा शब्द आहे. त्या दिशेने न्यायालयात प्रकरण सुरू आहे.
पंतप्रधान किसान योजनेतंर्गत आपणवर्षाला ६000 रुपये देणार तरदुसरीकडे काँग्रेसने महिन्याला ६000रुपये देण्याची घोषणा केली आहे.वचन कोण देते, यावर ते अवलंबून आहे. नेहरूंनी गरिबी हटाओची घोषणा केली होती, इंदिराजींनीही दिली होती, राजीव गांधी व सोनियाजींनीही दिली होती, आता राहुलजी देत आहेत. पाच पिढ्यापासून ते गरिबी हटवू शकले नाहीत. आम्ही पाच वर्षात गरीबांच्या आयुष्यात मोठे बदल घडवून आणले आहेत.
भाजपाचा एकही उमेदवार मुस्लीमनाही. जया प्रदांमुळे मुख्तार अब्बासनक्वी यांचे तिकिट कापले.शाहनवाज हुसेन यांची जागा आपणजेडीयूसाठी दिलीत ?माझ्या माहितीनुसार मुख्तार अब्बास नक्वी गेल्या निवडणुकीतही लढले नव्हते. तिकिट कापण्याचा प्रश्नच नाही. शाहनवाजजी लढले होते. परंतु यावेळी ती जागा युतीमुळे सहकारी पक्षाला मिळाली. आम्ही हिंदु-मुस्लीम अशा आधारावर निर्णय करत नाही आणि यापूर्वीही फार जागा दिलेल्याच नाहीत.
आपल्यापेक्षा बेकारीच्या मुद्द्यांवरविरोधक जास्त आक्रमक आहेत.शेतकऱ्यांच्या बाबतीतही आपणकाही बोलला नाहीत?देशातील १२ कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या मोबाइलवर ६000 रुपये थेट हस्तांतरित केलेले आहेत. यापेक्षा अधिक काँक्रिट काम असू शकत नाही. भाजप आणि यूपीए आघाडीचे गहू आणि भाताच्या खरेदीचे आकडे पाहा. कित्येकपटीने अधिक धान्याची खरेदी भाजप सरकारने केली आहे. १४ कोटी लोकांना मुद्रा योजनेतून कर्ज मिळाले, यातून एकही रोजगार निर्माण झाला नाही काय?
राहुल गांधी दोन ठिकाणहून लढतआहेत याविषयी तुम्ही बोलता. पणनरेंद्र मोदीही गेल्यावेळी दोनठिकाणाहून निवडणूक लढले होते ?दोघांची तुलनाच होऊ शकत नाही. मोदीजी उत्तर प्रदेशात उत्साह वाढविण्यासाठी दोन ठिकाणांहून लढले, परिणामी तेथे भाजपला ७३ जागा मिळाल्या. मोदी बडोदातूनही विक्रमी मतांनी जिंकले होते. पण राहुलजी घाबरून दुसºया जागेवर लढत आहेत. वायनाडमध्येही आमचे सहकारी पक्ष तेथे सोडणार नाहीत.
आपण गांधीनगरमधून लढत आहात,तेथे अटलजी जिंकले, तेव्हा १३दिवसांचे सरकार बनले.अडवाणीजींना निरोप दिला गेला.तेथून जो जिंकतो, त्यांचे राजकीयजीवन खराब होतो..?अडवाणीजींचा उदयच गांधीनगर येथून झाला. त्यांनी २५ वर्षे तेथून प्रतिनिधीत्व केले. अजूनही त्यांनी राजकारणातून संन्यास घेतलेला नाही. ९२ वर्षाच्या वयोमानानुसार त्यांचे आरोग्यही उत्तम आहे आणि पक्षाला चांगल्या प्रकारे ते मार्गदर्शन करीत आहेत.
गांधी घराण्याला आपल्याला पराभूतकरायचे आहे, असे म्हणता.घराणेशाहीचा आरोप करता आणिआपल्याच पक्षात या परिवारातीलमेनका आणि वरुण गांधीही आहेत.दोघांनाही तिकिट दिले, याचे काय कारण?दोघेही अनेक वर्षापासून लढत आहेत. २0१४ पासून याची सुरुवात झाली.
निवडणुकीत ज्या पद्धतीने राहुलगांधी यांनी आक्रमकता दाखविलीआहे, त्याकडे आपण कसे पाहता? तेचौकीदार चोर हैची घोषणा देतात.३७0 वे कलमही ठेवणार आणिदेशद्रोहाचा कायदाही हटविणार असेम्हणतात.काँग्रेस पक्षाने देशद्रोहाचा कायदा बदलणे आणि हटविण्याची घोषणा एवढ्याचसाठी केली, की जेएनयूमध्ये जेव्हा देशद्रोहाच्या घोषणा झाल्या, तेव्हा राहुल गांधी त्यांच्या समर्थनार्थ गेले होते. त्या घोषणा देणाºयांमध्ये देशद्रोहाचे आरोप लावले आहेत. आज त्यांच्याच समर्थनार्थ काँग्रेस आपला निवडणुकीचा अजेंडा घेउन आली आहे.
काँग्रेस म्हणते की,निवडणुकीदरम्यानच सर्जिकलस्ट्राईक कशासाठी ? त्यांच्या काहीनेत्यांना पुरावेही हवे आहेत.सर्जिकल स्ट्राईक हे पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी केला, भारताने आपल्या आत्मरक्षणासाठी केला. याचेही त्यांनी पुरावे मागितले. त्यांचे गुरु सॅम पित्रोडा पाकिस्तानशी चर्चा करा म्हणतात. संपूर्ण देश जेव्हा उत्साहाने फटाके उडवित होते, शहीद जवानांच्या प्रतिमेवर फुल अर्पण करत होते, तेव्हा राहुल गांधी यांचा चेहरा पडला होता. काँग्रेसच्या कार्यालयात सुतक होते. यावरुनच त्यांचेयावरुनच त्यांचे मानस कळते. त्यांचा पक्ष देशाच्या सुरक्षेसाठी समर्पित नाही. जिथे देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे, जिथे पाकिस्तानला उत्तर द्यायचा प्रश्न आहे, तेव्हा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप झिरो टॉलरेन्ससह दहशतवाद आणि पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी सज्ज आहे. देशाच्या सुरक्षिततेसाठी आम्ही कठोरातील कठोर निर्णय घेण्यात मागे हटणार नाही, हे आम्ही दाखवून दिले आहे. हा जोश, ही हिम्मत मुंबई हल्ल्यानंतर काँग्रेसने का नाही दाखविली? चौकीदारापासून कोणाला भीती हे सर्वचजण जाणतात. यामुळेच हे सर्वजण एकत्र आले आहेत.
निवडणुकीत पारदर्शकताआणण्यासाठी जो निवडणुक रोखेसरकारने जारी केले, त्याचा ९५ टक्केफायदा भाजपलाच मिळत आहे?इतर पक्ष रोखीने देणग्या स्विकारते. आमच्या पक्षाने ही पध्दतच बंद केली आहे. यामुळेच आमच्या पक्षात सर्वाधिक रोखे आले. ते पक्षाच्या खात्यात जातात, हे अगदीच सरळ आहे.
बिहारमध्ये असे काय घडले, कीगिरिराज सिंह यांच्या विरोधात बराचकाळ मुद्दा धुमसत होता?गिरिराज घाबरणाऱ्यातील नाहीत. आमची पक्षातंर्गत संघटनात्मक समस्या होती, मी तीही सोडविली आहे. गिरिराजजी रिंगणात आहेत, आणि ते प्रचंड बहुमतांनी जिंकून येतील.
रविशंकर प्रसादबाबत आपण कायम्हणाल, शत्रुघ्न सिन्हा यांच्यापुढेत्यांना कठीण परीक्षा द्यावी लागेल?काहीही कठीण नाही, ती भाजपचीच जागा आहे, आणि भाजपच तेथे जिंकेल. अतिशय सरळ आणि थेट लढत आहे. पाटणासाहेब आमची अतिशय जुनी जागा आहे.
गांधीनगरहून जे जिंकतात ते कमीतकमी नॉर्थ ब्लॉक किंवा साउथब्लाकपर्यंत तरी पोहोचतातच.यामुळेच हा प्रश्न विचारला?आमच्या पक्षात अध्यक्षपद हेच सर्वात मोठे पद आहे. मी जे काम केले आहे, त्यात संतुष्ट आहे. पुढे पक्ष निर्णय घेईल.
७५ वर्षावरील नेत्यांना तिकिट नदेण्याच्या नियमाचे पालन झाले तर२0२६ मध्ये मोदीजीसुध्दा पंच्याहत्तरीपार करतील. तेव्हा तेही या धोरणाचेपालन करतील?सध्या तरी २0१९ च्या निवडणुकीची मतमोजणी होउ दे.सरकार बनू दे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बरेच काम करायचे आहे, त्यांच्याजवळ वेळ खूप कमी आहे.
नरेंद्र मोदी यांच्यानंतर आपल्यालाचया पक्षाच्या प्रमुखपदी पाहण्यासमिळेल काय?अनेकजण पक्षाचे आघाडीचे शिलेदार आहेत. मी सर्वांचाच सन्मान करतो. मी अशा प्रकारचे निर्णय घेत नाही.
पक्षाच्या प्रमुखपदावरुन आपणबरीच कामे केली आहेत.आणखी काही कामे करणेबाकी आहेत, असेआपणास वाटते का ?आम्ही मीडियाला आमच्यासोबत घेउ शकलेलो नाही. हे काम बाकी आहे. पुढच्या काळात कदाचित हे काम पूर्ण होईल.
मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणिराजस्थानात विधानसभानिवडणुकीचे जे निकाल आले,त्याची पुनरावृत्ति होणार काय?जराही नाही. कारण ही निवडणुक देशाची निवडणुक आहे आणि देशात मोदी लाट कायम आहे. आम्ही आधीच अनेक जागा जिंकत आहोत, पुढचे सरकार आणखीन मजबूत होईल. जे असा अंदाज व्यक्त करीत आहेत, त्यांना या तीन राज्यांतील आमच्या मतांची टक्केवारीचा अभ्यास करावे लागेल. आम्ही मोठा विजय मिळवू.
या विश्वासाचे कारणबालाकोट आहे काय?देशावर आक्रमण करणाऱ्यांना धडा शिकविणे ही सरकारची जबाबदारी नाही काय? जर काँग्रेसचे सरकार कमजोर झाले तर भाजपसुध्दा त्यांचे अनुकरण करेल? देशाला पंतप्रधान मोदी यांच्याकडून अशाचप्रकारची अपेक्षा नव्हती काय? जवान, युवक, प्रत्येक नागरिकांच्या इच्छेनरूप काम करणे, सरकारचे कर्तव्य नाही काय ? आम्ही देशातील जनतेला विश्वास देतो, की जेव्हा कधी पुलवामासारखे हल्ले कोणी करेल, त्यांना अशाचपध्दतीने उत्तर दिले जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये ना असे सहन करणार, ना शांत राहणार. दहशतवाद संपवणे व शांतता आणणे हे आमचे कर्तव्य आहे. यामुळे आम्ही पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवादी अड्डे उध्दवस्त केले. ही लष्करी कारवाई नव्हती, म्हणून सामान्य माणसांची वस्तीवर हल्ले केले नाहीत. आम्ही विश्वशांतीच्या बाजूने आहोत, परंतु आमचे शांत राहणे आमची कमजोरी नाही.
काश्मिरमध्ये उमरअब्दुल्ला आणिमहबूबा मुफ्ती यांनीदेशापासून वेगळेहोण्याची भाषा केलीआहे, त्याबाबतआपण काय म्हणाल?त्या लोकांनी आपले धोरण काय आहे, हे स्पष्ट केले आहे. परंतु भाजप देशाला आश्वस्त करते, की आम्ही या देशाची फाळणी होउ देणार नाही. राजकारणापेक्षा देश सर्वप्रथम आहे. देशाची फाळणी करणाऱ्यांना निवडणार की हा देश एकसंघ ठेवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अधिक मजबूत पाठिंबा देणार, हे आता लोकांनीच ठरवायचे आहे.
या निवडणुकीत चंद्राबाबूनायडू, अरविंद केजरीवाल,ममता बॅनर्जी, शरद पवार,अखिलेश यादव, मायावतीयासारख्या विरोधकांनी एकमोट बांधली आहे, त्याकडेतुम्ही कसे पाहता ?चौकीदाराची सतर्कता, समर्पण, चोरी न होण्याबद्दलची जबाबदारीला घाबरुन हे सर्वजण एकत्र झाले आहेत, हे जनतेला माहिती आहे. पुन्हा एकदा नरेंद्र मोदीच पंतप्रधान होतील आणि देश प्रगती, सर्वसमावेशक विकासाकडे जाणारे सशक्त सरकार बनेल. आम्ही लाखो, करोडो योजना कार्यान्वित केल्या आहेत. स्वच्छता, शौचालय, उज्वला, उजाला, महामार्ग, आयुष्यमान योजना कोणताही आरोप न होता पूर्ण केल्या आणि यामुळे लोकांना सशक्तही बनवले.
आम्ही दिल्लीतूनही लोकमतचीमराठी आवृत्ती सुरू केली आहे.जवळपास १५ हजार मराठी भाषिकांकडे हे वृत्तपत्र पोहोचते. काय वाटते?भाषेचे संरक्षण आणि येणाºया पिढीला आपली मातृभाषेचा परिचय करुन देण्यात भाषिक वृत्तपत्रांची भूमिका महत्वाची आहे. लोकमतला यासाठी शुभेच्छा. भाजपचे हे सदैव म्हणणे आहे, की जर भारताच्या संपूर्ण विकासाला गती द्यायची असेल तर तो देशभरातील नागरिकांच्या विचारांना समजून घ्यावे लागेल, ऐकावे लागेल. हे काम देशातील विविध भाषिक वृत्तपत्रे आणि मीडियामार्फतही शक्य आहे. त्यांच्या माध्यमातूनच हा सुसंवाद घडेल. यामुळेच मोदी आणि मी स्वत: देशातील विविध भागात सातत्याने जात असतो. दिल्लीत बसून गावचा, शेतकºयांचा आणि गरीबांचा निर्णय घेतला जाण्याच्या संस्कृतीला आम्ही थारा दिलेला नाही. भाजप गावोगावी जाउन गरिबांची दु:खे जाणून घेत आहे. यामुळेच आम्ही गावांच्या आणि गरिबांच्या उत्थानासाठी यशस्वी पाउल टाकण्यात आणि योजना कार्यान्वित करण्यात यश मिळविले आहे. हे काम यापुढेही असेच सुरू राहील.