शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

ईव्हीएममध्ये घोटाळा नाही - राजनाथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2019 23:15 IST

विजय संकल्प सभेत केंद्रीय गृहमंत्र्यांचा स्पष्ट निर्वाळा

नालासोपारा : इलेक्ट्रॉनिक व्होटींगमशिनमध्ये कोणताही घोटाळा नाही जर असता तर काही राज्यात तुम्हची सत्ता आली असती का आपली सत्ता आली तर इव्हीएममध्ये घोटाळा होता असा आरोप करणे हा दुतोंडीपणा आहे अशी टीका केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी येथील युतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारासाठी आयोजिलेल्या विजय संकल्प सभेत केली. राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड मध्ये निवडणुका जिंकल्यावर ईव्हीएम बद्दल का बोलले नाहीत असा आरोप राजनाथ सिंग यांनी केला आहे. देशात मजबूत सरकार आणण्यासाठी राजेंद्र गाडीत यांना मत द्या व विजयी करा. राजेंद्र गावित यांना मी पहिल्यांदा भाषण करताना पाहिले असून हा २४ कॅरेटचा हिरा तुम्हाला उमेदवार म्हणून दिला असल्याची स्तूती त्यांनी केली.गरिबीच्या मुद्यावर आजपर्यंत काँग्रेसने राजकारण केले असून भाजप हा मतदारांच्या डोळ्यात धूळ झोकणारे राजकारण करत नाही तर देशाची मान उंचावेल असे राजकारण आजपर्यंत केले असल्याचेही त्यांनी सांगितले. आमचे सरकार आतंकवादाचे दुष्मन असून तुम्ही कोणालाही न घाबरता बिनधास्तपणे मतदान करा आणि गावीतला निवडून आणा असे आवाहनही त्यांनी केले. युती ही अबाधित असून ती कोणीही तोडू शकत नाही, शरद पवार यांनी पहिलीच हवा पाहिली म्हणून लोकसभा निवडणुकीतुन माघार घेतली असेही ते म्हणाले.दुनियेचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला असून भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा वाढली आहे. रसिया, चीन आणि अमेरिका या मातब्बर देशांच्या पंगतीमध्ये लवकरच जाऊन बसणार, २०३० ते २०३१ च्या दरम्यान भारताचा अर्थसंकल्प खूप तेजीने वाढणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019palghar-pcपालघरRajnath Singhराजनाथ सिंह