२०१९ लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. दरवर्षी निवडणुकीत केवळ सामान्य लोकंच नाही तर बॉलिवूडसेलिब्रिटीही उत्साहात बघायला मिळतात. तसेच हे लोक मतदान करण्याचं आवाहनही करतात. पण यातील काही कलाकार असेही आहेत जे लोकसभा निवडणुकीत मतदान करु शकणार नाहीत. यात बॉलिवूडच्या टॉपच्या कलाकारांचा समावेश आहे.
१) अक्षय कुमार
बॉलिवूडचा खिलाडी कुमारचा जन्म पंजाबच्या अमृतसरमध्ये झाला होता. पण अधिकृतपणे तो भारताचा नागरिक नाहीये. अक्षय कुमारकडे कॅनडाचा पासपोर्ट आहे. भारतीय नियमानुसार, तुम्ही दोन देशांचं नागरीकत्व ठेवू शकत नाहीत. त्यामुळे अक्षय कुमार भारतात मतदान करु शकणार नाही.
२) आलिया भट्ट
कोट्यवधी तरुणांच्या हृदयाचा ठोका चुकवणारी आणि बॉलिवूडची सध्याची टॉपची अभिनेत्री आलिया भट्ट ही सुद्धा भारतात मतदान करु शकणार नाही. आलिया भट्टची आई सोनी राजदान या ब्रिटीश नागरिक आहेत. आणि आलियाकडेही ब्रिटीश पासपोर्ट आहे.
३) दीपिका पादुकोन
बॉलिवूडची सर्वात जास्त लोकप्रिय असलेली आणि सतत चर्चेत राहणारी अभिनेत्री दीपिका सुद्धा या यादीत आहे. तिचे वडील जरी भारतीय असले तरी दीपिकाचा जन्म डेनमार्कच्या Copenhagen मध्ये झाला होता. तिच्याकडे Danish पासपोर्ट आहे.
४) कतरिना कैफ
अभिनेत्री कतरिना कैफचे वडील कश्मीरी आहेत. पण कतरिनाचा जन्म हॉंगकॉंगमध्ये झाला होता आणि तिच्याकडे ब्रिटीश पासपोर्ट आहे. त्यामुळे इच्छा असूनही ती भारतात मतदान करु शकत नाही.
५) जॅकलीन फर्नांडिस
लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या जॅकलीनचा जन्म Bahrain च्या Manama मध्ये झाला होता. तिचे वडील श्रीलंकेचे तर आई मलेशियाचे नागरिक आहेत. २००६ मध्ये मिस यूनिव्हर्स श्रीलंका स्पर्धा जिंकल्यावर जॅकलीनने बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं होतं.