सावंतवाडी : 2014 मध्ये मला राजकारण सोडायचा विचार डोक्यात आला होता.पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलवून मला खासदार केले आणि नंतर मंत्री केले त्यामुळेच मी आता राजकारणात आहे.जरी आंध्रप्रदेशातून राज्यसभेवर गेलो असलो तरी सिंधुदुर्ग च्या विकासासाठी आवश्यक तो पाठपुरावा करेन असा गौप्यस्फोट माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार सुरेश प्रभू यानी केला.
ते सावंतवाडीत आयोजित कार्यक्रमात बोलत होते.यावेळी भाजप चे जिल्हाध्यक्ष राजन तेली,नगराध्यक्ष संजू परब,सुधीर आडिवरेकर,उदय नाईक, आनंद नेवगी,परिमल नाईक, मनोज नाईक मुख्याधिकारी जंयत जावडेकर आदि उपस्थीत होते.माजी मंत्री प्रभू म्हणाले,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची मान जगात उचवण्याचे काम केले आहे.देशात लाॅकडाऊन करणे योग्यच होते.हे आता केंद्रिय नियोजन विभागाने मान्य केले आहे.
अन्यथा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असता असा धोका ही त्यानी व्यक्त केला आहे.कोरोना काळात सगळीकडेच निधीची कमतरता भासत आहे.त्यातच खासदार निधीही पुढील दोन वर्षांसाठी बंद आहे.मात्र कोकणचा विकास कुठेही थांबणार नाही याची काळजी घेतली जाईल असे सांगत प्रभू यांनी आपण पूर्वो शिवसेनेत होतो तरीही नगरपालिकेला मोठ्या प्रमाणावर निधी दिला होता.आता ही निधी देऊ असे सांगितले मी आंध्रप्रदेश मधून खासदार आहे.त्यामुळे मला इकडे खासदार निधी देता येत नसला तरी केंद्र सरकार च्या माध्यमातून निधी देणार असल्याचे सांगितले.
प्रभू यानी बोलण्याच्या ओघात मला 2014 मध्ये मला राजकारण सोडायचे होते.असे सांगितले.तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलवून मला खासदार केले आणि नंतर मंत्री केले त्यामुळेच मी आता राजकारणात आहे.अशी स्पृष्टी ही जोडली.चिपी विमानतळाच्या परवानग्या आपल्यामुळेचिपी विमानतळाच्या परवानग्या मिळणे कठीण काम होते.पण मी तेव्हा नागरी हवाई उड्डाण मंत्री असल्याने ते शक्य झाले संरक्षण तसेच गृहविभाग व पंतप्रधान कार्यालयाच्या परवानग्या घेतल्या असून आता जानेवारी पर्यंत काम पूर्ण करून दिल्यास विमानतळ सुरू होईल असे ही प्रभू म्हणाले.