"वेळ बदलते, फार उशीर लागत नाही"; श्रीनिवास पवारांचे अजित पवारांच्या वर्मावर बोट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 08:19 PM2024-10-29T20:19:51+5:302024-10-29T20:20:47+5:30

Shrinivas Pawar News: बारामतीतील नक्कलांचं राजकारण सध्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनलं आहे. त्यावरूनच आता श्रीनिवास पवार यांनी अजित पवारांना डिवचलं.

"Times change, it's not too late"; Srinivas Pawar's finger on Ajit Pawar's Verma | "वेळ बदलते, फार उशीर लागत नाही"; श्रीनिवास पवारांचे अजित पवारांच्या वर्मावर बोट

"वेळ बदलते, फार उशीर लागत नाही"; श्रीनिवास पवारांचे अजित पवारांच्या वर्मावर बोट

Shrinivas Pawar News Marathi: लोकसभा निवडणुकीत अजित पवारांनी सुप्रिया सुळेंची नक्कल केली होती. 'कसा आहेस तू, बरा आहेस ना, एकदा येऊन भेट', असे अजित पवार म्हणाले. त्यांच्या याच विधानाची आठवण करून देत आज श्रीनिवास पवार यांनी वर्मावर बोट ठेवलं. मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

युगेंद्र पवार उभे आहेत, अजित पवार त्यांच्याविरोधात आहेत, रणनीती काय आहे? असा प्रश्न श्रीनिवास पवार यांना विचारण्यात आला.

श्रीनिवास पवार म्हणाले, "मी एक प्रचारक आहे. मी काही राजकारणात नाहीये. त्यामुळे पक्ष जे ठरवतो. त्याप्रमाणे मला एक काम दिलंय की, प्रत्येक घरी जायचं. मी जातोय. मी कुठे भाषणं करत नाहीये. काल दादांनी (अजित पवार) फॅमिलीचं काढलंय म्हणून मी तुमच्याशी बोलतोय. ते जर फक्त विकासावर बोलत राहिले तर आपली भेटही होणार नाही." 

सुप्रिया सुळेंची नक्कल अजित पवारांनी लोकसभा निवडणुकीवेळी केली होती. त्याबद्दल बोलताना श्रीनिवास पवार म्हणाले, "ज्या सुप्रिया सुळेंची त्यांनी नक्कल केली होती. कसा आहेस तू, बरा आहेस ना, येऊन भेट. तुम्ही जर बारकाईने बघितले तर त्याच गोष्टी दादा आता स्वतः  बारामतीकरांना विचारताहेत कसा आहेस तू. म्हणजे चार महिन्यात... वेळ बदलते. फार उशीर लागत नाही", असा टोला श्रीनिवास पवारांनी अजित पवारांना लगावला. 

ते पुढे म्हणाले, "जो दादा रोहित पवार आजोबांबद्दल भावूक झाला, तर ते रडलेले लगेच दादांनी दोन मिनिटांनी नक्कल केली. मग चार महिन्यांनी काल त्याच दादांवर डोळ्यात अश्रू यायची वेळ आली. काळ बदलतो."

श्रीनिवास पवार पुढे म्हणाले की, "घड्याळ त्यांच्याकडे (अजित पवार) आहे, पण वेळ साहेबांच्या (शरद पवार) हातात आहे", असा टोलाही श्रीनिवास पवारांनी लगावला. 

 

Web Title: "Times change, it's not too late"; Srinivas Pawar's finger on Ajit Pawar's Verma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.