तृणमूल काँग्रेसच्या खासदार आणि बंगाली अभिनेत्री नुसरत जहाँ(Nusrat Jahan) नेहमी चर्चेत राहणारी सेलेब्रिटी आहे. अभिनय क्षेत्रातील यशस्वी करिअर, निवडणूक निकाल आणि निखील जैन याच्याशी दुसऱ्या धर्मात केलेला विवाहामुळे नुसरत जहाँ कायम चर्चेत राहिली. पण आता नुसरत जहाँ भलत्याच एका कारणामुळं चर्चेत आहे. काही रिपोर्टसच्या दाव्यानुसार नुसरत जहाँ ही ६ महिन्याची गर्भवती(Nusrat Jahan Pregnant) आहे आणि तिचा नवरा निखील जैन(Nikhil Jain) याला ती गर्भवती असल्याची माहितीच नाही.
गेल्या काही दिवसांपासून नुसरत आणि निखील एकमेकांपासून वेगळे राहतात. या दोघांचे लग्न मोडण्याच्या स्थितीत आहे. नुसरत जहाँ गरोदर असल्याच्या बातम्या काही रिपोर्टमधून छापून आल्या आहेत. परंतु नुसरत आणि त्यांच्या कोणत्याही टीमकडून या बातमीला दुजोरा दिला नाही. परंतु सोशल मीडियावर यावर प्रचंड चर्चा सुरू आहे. अनेक बंगाली न्यूज रिपोर्टमध्ये सांगण्यात येत आहे. नुसरत जहाँ गरोदर असल्याबाबत तिचा नवरा निखील जैन याला कोणतीच माहिती नाही.
ते मुलं माझं नाही?
ABP आनंदच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, निखील जैन आणि नुसरत जहाँ यांचे लग्न मोडण्याच्या स्थितीत आहे. गेल्या ६ महिन्यापासून निखील नुसरतसोबत राहत नाही यात नुसरत जहाँ जर गरोदर असेल तर ते मुलं माझं नाही असं निखीलनं म्हटलं आहे. इतकचं नाही तर अनेक महिन्यांपासून आमच्या दोघांचा काहीही संपर्क नाही असंही निखीलने सांगितले आहे.
यश दासगुप्तासोबत नुसरत जहाँ रिलेशनशिपमध्ये?
मागील काही दिवसांपासून नुसरत जहाँ ही बंगाली अभिनेता आणि भाजपा नेता यश दासगुप्तासोबत (Yash Dasgupta) रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे. दोघांनाही अनेकदा एकत्र पाहिलं आहे. त्याचसोबत न्यू इयरच्या सेलिब्रेशनसाठी दोघंही राजस्थानला गेले होते. मात्र या चर्चांवर नुसरत, निखिल आणि यश दासगुप्ता यांच्याकडून कोणतंही अधिकृत स्टेटमेंट आले नाही. नुसरतनं एका मुलाखतीत म्हटलं होतं की, माझ्या खासगी आयुष्याबद्दल सार्वजनिकरित्या चर्चा होऊ नये. लोकं नेहमी मला टार्गेट करतात त्यामुळे वैयक्तिक मुद्द्यांवर ती बोलू इच्छित नाही.
लग्नानंतर नुसरत जहाँ चर्चेत
नुसरत जहाँने तिचा बॉयफ्रेंड उद्योगपती निखील जैनसोबत १९ जून २०१९ रोजी लग्न केले होते. नुसरत आणि निखील यांचे लग्न हिंदू, इस्लाम प्रथा परंपरेनुसार झालं होतं. लग्नानंतर नुसरत जहाँने कपाळात सिंदूर लावून दुर्गा पुजेतही सहभागी झाली होती. तेव्हा अनेक कट्टरतावादी मुस्लिमांनी नुसरत जहाँवर टीकास्त्र सोडलं होतं. त्याला नुसरत जहाँनेही जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं.