पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याचं मतदान पार पडलं. तृणमूल काँग्रेस आपला गड राखण्याच्या प्रयत्नात आहे. तर पश्चिम बंगालमध्ये भाजपही आपली ताकद वाढवू पाहत आहे. अशातच दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडण्यात येत नाही. भाजपनं तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांची फिरकी घेतली आहे. भाजपनं आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. तसंच यात त्यांना आपला राग आवरला जात नसल्याचंही दिसून येत आहे. एका तासापेक्षा जास्त प्रचार तर मी ममता बॅनर्जींसाठीही करत नाही, असं म्हणतानाचा एक व्हिडीओ भाजपनं शेअर केला आहे. लवकरच पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्याचं मतदान पार पडणार आहे. यासाठी नुसरत जहाँ या एक रोड शो करत होत्या. "मी एका तासापेक्षा जास्त कालावधीपासून प्रचार करत आहे. इतका तर मी ममता बॅनर्जींसाठीही करत नाही," असं त्या या रोड शोदरम्यान व्हिडीओत बोलताना दिसत आहे. यानंतर त्या गाडीतूनही खाली उतरल्याचं दिसत आहे.
'एका तासापेक्षा जास्त प्रचार ममता बॅनर्जींसाठीही करणार नाही'; नुसरत जहाँ यांचा व्हिडीओ शेअर करत भाजपनं घेतली फिरकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2021 12:30 IST
West Bengal Election 2021 : पश्चिम बंगाल निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याचं मतदान पडलं पार, भाजपनं तृणमूलच्या खासदार नुसरत जहाँ यांचा व्हिडीओ शेअर करत डिवचलं.
'एका तासापेक्षा जास्त प्रचार ममता बॅनर्जींसाठीही करणार नाही'; नुसरत जहाँ यांचा व्हिडीओ शेअर करत भाजपनं घेतली फिरकी
ठळक मुद्देपश्चिम बंगाल निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याचं मतदान पडलं पारभाजपनं तृणमूलच्या खासदार नुसरत जहाँ यांचा व्हिडीओ शेअर करत डिवचलं.