शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

राज्यातील १० जागांसह देशात ९५ मतदारसंघांत आज मतदान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 7:03 AM

महाराष्ट्रातील १0 लोकसभा मतदारसंघांसह देशातील ९५ जागांसाठी आज, गुरुवारी मतदान होत असून, त्यात १५ कोटी ७९ लाख ३४ हजार मतदान आपला हक्क बजावतील.

नवी दिल्ली/मुंबई : महाराष्ट्रातील १0 लोकसभा मतदारसंघांसह देशातील ९५ जागांसाठी आज, गुरुवारी मतदान होत असून, त्यात १५ कोटी ७९ लाख ३४ हजार मतदान आपला हक्क बजावतील. या ९६ मतदारसंघांत माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह, फारुख अब्दुल्ला, खा. हेमा मालिनी, खा. कणिमोळी, राज बब्बर, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, प्रकाश आंबेडकर, कार्ती चिदम्बरम, तारीक अन्वर यांच्यासह १६०० उमेदवार रिंगणात आहेत.महाराष्ट्रासह १२ राज्ये व एका केंद्रशासित प्रदेशात हे मतदान होणार असून, तामिळनाडूतील वेल्लोर मतदारसंघातील निवडणूक रद्द करण्यात आली आहे. महाराष्टÑातील अकोला, अमरावती, नांदेड, हिंगोली, बीड, परभणी, उस्मानाबाद, सोलापूर, लातूर बुलडाणा या १0 मतदारसंघांचाही त्यात समावेश आहे. याशिवाय तामिळनाडू (३८), कर्नाटक (१४), बिहार, ओडिशा व आसाम (प्रत्येकी ५), उत्तर प्रदेश (८),पश्चिम बंगाल व छत्तीसगढ ( प्रत्येकी ३), जम्मू-काश्मीर (२) तर मणिपूर,त्रिपुरा (प्रत्येकी एक) या राज्यांतील तसेच केंद्रशासित प्रदेश पुडुच्चेरी ( प्रत्येकी १) मध्येही मतदान होईल.तामिळनाडूतील वेल्लोरची निवडणूक रद्द झाली असून, त्रिपुरा (पूर्व) मध्ये आता गुरुवारऐवजी २३ एप्रिल रोजी मतदान होईल.या टप्प्यामध्ये केंद्रीय मंत्री ज्युअल ओराम, सदानंद गौडा आणि पी.राधाकृष्णन्, कॉँग्रेसचे वीरप्पा मोईली, द्रमुकचे दयानिधी मारन, ए. राजा, शिवसेनेचे आनंदराव अडसुळ, भाजपच्या प्रीतम मुंडे, काँग्रेसप्रणित आघाडीतील युवा स्वाभिमानीच्या नवनीत राणा यांचे भवितव्यही ठरणार आहे.ओडिशा विधानसभेच्या ३५ जागांसाठीही गुरुवारीच मतदान होत असून, त्यात मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या बिजेपूर मतदारसंघाचाही समावेश आहे. ते दोन मतदारसंघांतून विधानसभेची निवडणूक लढवत आहेत.१९ केंद्रांवर फेरमतदानअतिरेक्यांनी मतदान यंत्रे व व्हीव्हीपॅट यंत्रांची तोडफोड केल्याच्या तक्रारी आल्याने निवडणूक आयोगाने बाह्य मणिपूर मतदारसंघातील १९ मतदान केंद्रांवरही गुरुवारी फेरमतदान घेण्याचे ठरविले आहे.>तामिळनाडूच्या ३८ जागांचे एकाच टप्प्यात मतदानतामिळनाडूसह पुद्दुचेरी, त्रिपुरा आणि मणिपूर याचार राज्यांतील मतदान या टप्प्यानंतर पूर्ण होईल.तामिळनाडूच्या ३९ पैकी ३८ जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर होत असल्याचे आढळल्याने निवडणूक आयोगाने वेल्लुरची रद्द केली आहे. सध्या ३९ जागांपैकी ३७ जागांवर अण्णा द्रमुकचे खासदार आहेत. भाजप व पीएमकेचा प्रत्येकी एका ठिकाणी खासदार आहे.>दुसऱ्या टप्प्यातील ९५ जागांपैकी कोणाचे किती खासदार होते?रालोआ : 33 । भाजप : २७, शिवसेना : ४, आॅल इंडिया एनआर काँग्रेस : १, पीएमके : १संपुआ : 15 । कॉँग्रेस : १२, राजद : २, राष्टÑवादी : १इतर : 49 । अण्णाद्रमुक : ३५, बिजद : ४, माकपा : ४, जेडीएस : २, पीडीपी : १, जेडीयू : १, तृणमूल : १, एआययूडीएफ : १>सध्या कुठे आहे कुणाचा खासदारभाजपा : अकोला, बीड, सोलापूर, लातूरशिवसेना : बुलडाणा, अमरावती, परभणी, उस्मानाबादकॉँग्रेस : नांदेड, हिंगोली>12राज्यांत लढाईराज्य जागातामिळनाडू : ३८कर्नाटक : १४महाराष्टÑ : १०बिहार : ५आसाम : ५ओडिशा : ५उत्तर प्र्रदेश : ८पश्चिम बंगाल : ३छत्तीसगड : ३जम्मू-काश्मीर : २मणिपूर : १पुद्दुच्चेरी : १एकूण : ९५

>या मंत्र्यांचेभवितव्य आज होणार यंत्रबंद>केंद्रीय सांखिकी मंत्री सदानंद गौडा हे बंगळुरू उत्तरमधून पुन्हा निवडणूक लढवित आहेत. यावेळी त्यांना कॉँग्रेस-जेडीएस युतीचे कृष्णा बायरे गौडा यांचे आव्हान आहे. सदानंद गौडा यांनी मतदारसंघाकडे दुर्लक्ष केल्याचा मुख्य आक्षेप आहे.केंद्रीय आदिवासी विकासमंत्री ज्युअल ओराम ओरिसातील सुंदरगडमधून पुन्हा नशीब अजमावत आहेत. विरोधात सुनिता बिस्वाल (बिजद) आणि जॉर्ज तिर्की (कॉँग्रेस) आहेत.>केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पी. राधाकृष्णन हे तामिळनाडूच्या कन्याकुमारी मतदारसंघातून पुन्हा रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या विरोधात कॉँग्रेसने पुन्हा एच.वसंतकुमार यांनाच उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघामध्ये नाडर मतदारांचे वर्चस्व आहे.>देवेगौडा, फारुख अब्दुल्ला, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, हेमामालिनी, प्रकाश आंबेडकर, सदानंद गौडा, पी. राधाकृष्णन, वीरप्पा मोईली, आनंदराव अडसूळ या दिग्गजांचा होणार फैसला

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019BJPभाजपाcongressकाँग्रेस