BJP Nishikant Dubey: "शशी थरूर यांच्यामुळे भारताच्या प्रतिमेला गेला तडा, त्यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द करा"; भाजपाचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 03:34 PM2021-05-25T15:34:19+5:302021-05-25T16:51:08+5:30
BJP Nishikant Dubey And Congress Shashi Tharoor : आयटी समिती सदस्य पदावरून हटवण्यासह त्यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी निशिकांत दुबे यांनी केली आहे.
नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून टूलकिट (Toolkit) प्रकरणावरून काँग्रेस आणि भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. एकमेकांवर निशाणा साधत टीकास्त्र सोडण्यात येत आहे. याच दरम्यान काँग्रेस खासदार आणि आयटी समितीचे सदस्य असलेल्या शशी थरूर (Congress Shashi Tharoor) यांच्यावर भाजपा (BJP) खासदाराने हल्लाबोल केला आहे. "शशी थरूर यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द करा" अशी मागणी केली आहे. भाजपा खासदार निशिकांत दुबे (BJP Nishikant Dubey) यांनी टीकास्त्र सोडलं आहे. त्यांना आयटी समिती सदस्य पदावरून हटवण्यासह त्यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी निशिकांत दुबे यांनी केली आहे. Toolkit BJP Nishikant Dubey writes to speaker to remove Congress mp Shashi Tharoor from parliament standing committee
दुबे यांनी यासाठी लोकसभा सभापती ओम बिरला यांना पत्र लिहीलं असून संविधानातील दहाव्या अनुसूचीतील नियमांचा संदर्भ देत सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली आहे. "शशी थरूर यांच्यामुळे संसद आणि भारताच्या प्रतिमेला तडा गेला आहे. कोरोना विषाणूच्या व्हेरियंटला भारताचं नाव ते वारंवार देत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनं याचं नाव B.1.617 असं दिलं आहे. त्यामुळे त्यांनी वापरलेल्या शब्दामुळे भारताची प्रतिमा मलीन होत आहे. भारत सरकारने या शब्दावर आक्षेप घेतला आहे. तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून हटवण्याची मागणी केली आहे. असं असूनही थरून वारंवार या शब्दाचा वापर करताना दिसत आहेत" असा आरोप दुबे यांनी पत्रात केला आहे.
टूलकिटवरुन प्रियंका गांधींचं जोरदार टीकास्त्र, म्हणाल्या...#Toolkit#Congress#priyankagandhi#BJP#Politics#Indiahttps://t.co/vuA7WaPIL1pic.twitter.com/Efqt08NUms
— Lokmat (@MiLOKMAT) May 18, 2021
शशी थरूर हे देशाऐवजी काँग्रेस पार्टी आणि राहुल गांधी यांच्या अजेंड्यावर काम करत असल्याचा आरोपही निशिकांत दुबे यांनी केला. "टूलकिटप्रकरणी आयटी मंत्रालयाकडून ते स्पष्टीकरण मागत आहे. ट्विटर देशाविरोधात कारवाई करत असताना स्पष्टीकरण मागणं चुकीचं आहे. हे प्रकरण तपास यंत्रणांकडे आहे. आयटी समिती सरकारच्या कारवाईत दखल देऊ शकत नाही" असंही दुबे यांनी म्हटलं आहे. टुलकिटवरून आता पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडताना दिसत आहे. काँग्रेसचे टूलकिट खलिस्तान्यांच्या टूलकिटपेक्षा खतरनाक असल्याची टीका भाजपाकडून करण्यात आली आहे. एकीकडे कोरोनाचे संकट देशावर अद्यापही कायम असताना, दुसरीकडे भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसवर आरोप केले.
"खोटी माहिती पसरवण्यात वेळ घालवू नका, जागे व्हा आणि लोकांचे जीव वाचवायला सुरुवात करा"
संकटातही काँग्रेस राजकारण करत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी काँग्रेसने एक टूलकिट तयार केले असल्याचे संबित पात्रा म्हणाले. यानंतर आता काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी (Congress Priyanka Gandhi) यांनी हे आरोप फेटाळून लावले. प्रियंका गांधी यांनी खोटी माहिती पसरवू नका असं म्हणत जोरदार टीकास्त्र सोडलं. प्रियंका यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं. "खोटी माहिती पसरवण्यात वेळ घालवू नका. जागे व्हा आणि लोकांचे जीव वाचवायला सुरुवात करा" असं ट्विट केलं. तसेच हे टूलकिट फेक असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. टूलकिटचा फोटो त्यांनी शेअर केला. त्यावर फेक असा उल्लेख करण्यात आला होता.
कमलनाथ यांच्यावर खोटी माहिती पसरवल्याचा आरोप#CoronavirusIndia#coronavirus#Kamalnath#BJP#Policehttps://t.co/X0DdAMPrPC
— Lokmat (@MiLOKMAT) May 24, 2021