मुंबई: अभिनेत्री कंगना राणौतकडून दररोज शिवसेनेवर जोरदार हल्ले सुरू आहे. मात्र शिवसेनेनं आता आपला पवित्रा बदलला आहे. कंगनाचा विषय आमच्यासाठी संपला आहे. देशात त्याहीपेक्षा महत्त्वाचे विषय आहेत. उद्यापासून सुरू होणाऱ्या संसदीय अधिवेशनात आम्ही ते उपस्थित करू, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. कंगनाच्या मागे कोणाचा हात आहे, हे सगळ्यांना माहीत आहे. त्यांच्याकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत, असं राऊत म्हणाले.VIDEO: 'मी ड्रग्जच्या आहारी गेले होते'; कंगना राणौतचा जुना व्हिडीओ व्हायरलमुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाच्या संरक्षणाची जबाबदारी आमची आहे. मुंबई प्रत्येकाची आहे. मात्र तिला बदनाम करण्याचा हक्क कोणालाही नाही. सध्या कोणता पक्ष काय बोलतोय याकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत. सत्ता गेलेली मंडळी राज्याबद्दल काय बोलत आहेत, याची नोंद आम्ही ठेवत आहोत, अशा शब्दांत राऊत यांनी भाजपच्या प्रत्येक हालचालीवर आपलं लक्ष असल्याचं सांगितलं. एखाद्यानं ठरवलंच असेल की तमाशाच करायचा, तर करू द्या, असा टोलादेखील त्यांनी लगावला.ज्यांना माफिया म्हणता, त्यांच्याच संरक्षणात फिरता?; राऊतांचा कंगनाला अप्रत्यक्ष टोलामुंबईत येतेय, रोखून दाखवा असं आव्हान देऊन मुंबईत दाखल झालेल्या कंगनावर शिवसेनासंजय राऊत यांनी नाव न घेता निशाणा साधला. ज्या पोलिसांना नाव ठेवता, माफिया म्हणता, त्याच पोलिसांच्या संरक्षणात फिरता, अशा शब्दांत राऊत यांनी कंगनाला लक्ष्य केलं. तुम्ही ज्या अभिनेत्रीचं नाव घेताय, तिचा विषय आमच्यासाठी संपलेला आहे, असं म्हणत राऊत यांनी कंगनावर अधिक बोलणं टाळलं. शिवसैनिकांनी मुंबईत एका माजी नौदल अधिकाऱ्याला मारहाण केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं व्यंगचित्र शेअर केल्यानं ही मारहाण करण्यात आली. त्यावरून विरोधकांनी सरकारला लक्ष्य करत कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित केला. 'घटनेनं निर्माण केलेल्या पदांवर असलेल्या व्यक्तींचा आदर राखणं नागरिकांचं कर्तव्य असतं. कोणीही आम्हाला विचारुन हल्ला करत नाही. मग त्या हल्ल्याची जबाबदारी सरकारची कशी?,' असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 'राज्यात शिवसेनेच्या चाललेल्या गुंडाराजवर मुख्यमंत्र्यांचं लक्ष असायला हवं'कायदा सुव्यवस्था राखणं म्हणजे नेमकं काय, असा सवाल उपस्थित करत त्यांनी केंद्र सरकारला थेट लक्ष्य केलं. 'मुंबईत माजी नौदल अधिकाऱ्यावर हल्ला झाला. त्यांना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी फोन केला. त्यांची विचारपूस केली. संरक्षणमंत्री यामध्ये फार रस घेत आहेत. उत्तर प्रदेशात कॅप्टनला गोळी घालण्यात आली होती. त्यावेळीही त्यांनी असाच फोन केला होता का?,' असा प्रश्न राऊत यांनी विचारला.कंगना राणौतला बीएमसीचा आणखी एक ‘जोर का झटका’, खारमधील फ्लॅटप्रकरणी पाठवली नोटीसकंगनाच्या आडून कोण राजकारण करतंय याची सगळ्यांना कल्पना आहे. सध्या ते काय काय बोलत आहेत ते आम्ही ऐकतोय. त्याची नोंद घेतोय. त्यांचे विचार पाहतोय. सत्ता गेली म्हणून काय तमाशे सुरू आहेत ते आम्हाला दिसतंय. लोकशाहीत बहुमत अतिशय चंचल असतं. विरोधकांनी संयम राखायला हवा. देशात अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. लडाखमधील तणाव, चीनसोबतचा सीमा प्रश्न, बेरोजगारी, जीएसटी, जीडीपीमधील घट असे प्रश्न आम्ही उद्यापासून सुरू असलेल्या संसदीय अधिवेशनात मांडू, असं राऊत म्हणाले.
कंगनाचा विषय आमच्यासाठी संपला; राऊतांनी शिवसेनेचा पुढील 'प्लान' सांगितला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2020 8:28 PM