नवी दिल्ली : बांगलादेशातील अभिनेते गझी अब्दुल नूर हे तृणमूल काँग्रेसचे उमेदवार सौगत रॉय यांच्या प्रचारात सहभागी झाल्याच्या तक्रारी आल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने नूर यांना गुरुवारी मायदेशी परत जाण्याचा आदेश दिला.गाझी अब्दुल नूर यांच्या व्हिसाची मुदत याआधीच संपली आहे. त्यामुळे त्यांना भारत सोडून जाण्यास सांगण्यात आले असून, मुदतीनंतरही भारतात वास्तव्य केल्याबद्दल त्यांच्यावर उचित कारवाई करण्यात येईल, असे गृह मंत्रालयाने म्हटले आहे. गाझी अब्दुल नूर तृणमूल काँग्रेसचा प्रचार करत असल्याची तक्रार भाजपने निवडणूक आयोगाकडे केली होती.
तृणमूल समर्थक बांगलादेशी अभिनेत्यांची मायदेशी रवानगी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 04:38 IST