शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

दोन दिवसांचं अधिवेशन म्हणजे चर्चेपासून पळ, फडणवीसांची ठाकरे सरकारवर टीका

By मोरेश्वर येरम | Updated: December 3, 2020 16:59 IST

केवळ दोन दिवसांचं अधिवेशन आम्हाला मान्य नाही", असं फडणवीस म्हणाले आहेत. 

मुंबईविधानसभेचे हिवाळी अधिवेशन येत्या १४ व १५ डिसेंबर रोजी होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. राज्य सरकारच्या या निर्णयावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विरोध केला आहे. ''केवळ दोन दिवसांचं अधिवेशन आम्हाला मान्य नाही", असं फडणवीस म्हणाले आहेत. 

"विधानसभेचं हिवाळी अधिवेशन पुन्हा एकदा पुढे ढकललं गेलं, पण त्यापेक्षा गंभीर बाब म्हणजे केवळ दोन दिवसांचं अधिवेशन १४ आणि १५ डिसेंबरला घेण्यात येणार आहे. आमचा सातत्याने आग्रह होता की महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांसमोर अभूतपूर्व संकट आहे. पहिल्यांदा पावसाने, अतिवृष्टीने, पुराने चक्रीवादळाने आणि रोगराईने शेती पूर्णपणे नष्ट झाली आहे. कापूस, सोयाबीनचं मोठं नुकसान झालं आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न रेंगाळला आहे. ओबीसींमध्ये भीतीचं वातावरण आहे. महिलांवरील अत्याचारांच प्रमाणही वाढलं आहे. या अनेक प्रश्नांवरील चर्चेसाठी विधानभवन हे महत्वाचं स्थान असताना दोन दिवसांचं अधिवेशन घेणे म्हणजे चर्चेपासून पळ काढण्याचा सरकारचा प्रयत्न आहे", अशी घणाघाती टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. 

राज्यात अनलॉक होत असताना विधानसभेच्या अधिवेशनावर बंधन का?राज्यात आपण सर्व अनलॉक करण्याची भूमिका घेतली आहे. जवळपास सर्व गोष्टी आता सुरू झाल्या आहेत. असं असताना विधानसभेच्या अधिवेशनावरच बंधन का?, असा सवालही फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. कोरोना काळ असल्याने किमान दोन आठवड्यांचं अधिवेशन बोलवावं अशी आम्ही मागणी केली होती पण ती मान्य न करता केवळ दोन दिवसांचं अधिवेशन बोलविण्यात आलं आहे. यातून सरकारचा चर्चेपासून पळ काढण्याचा उद्देश लक्षात येतो, असंही ते पुढे म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनBJPभाजपा